jacqueline fernandez : अमित शहांच्या नंबरवरून स्पूफ कॉल, शेखर बनून घेतली भेट, सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला असे फसवले

२०० कोटी रुपयांच गैरव्यवहाराचा ठपका असलेल्या आरोपी सुकेश चंद्रशेखरने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नंबरचा स्पूफ केला होता. जॅकलीनशी मैत्री करण्यासाठी सुकेश चंद्रशेखरने असे केले होते अशी माहिती इडीने दिली आहे. Thugs 'Spoof' Amit Shah's Office Number To Befriend Jacqueline Fernandez

sukesh and  jacqueline
सुकेश चंद्रशेखर 
थोडं पण कामाचं
  • सुकेश चंद्रशेखरने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नंबरचा स्पूफ केला होता.
  • केशने जॅकलीनला आपले नाव शेखर रत्न वेला असल्याचे सांगितले आणि तिची भेट घेतली होती.
  • सुकेश जॅकलीनवर पाण्यासारखा पैसे उधळत होता.

jacqueline fernandez : मुंबई :  २०० कोटी रुपयांच गैरव्यवहाराचा ठपका असलेल्या आरोपी सुकेश चंद्रशेखरने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नंबरचा स्पूफ केला होता. जॅकलीनशी मैत्री करण्यासाठी सुकेश चंद्रशेखरने असे केले होते अशी माहिती इडीने दिली आहे. सुकेशने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाचा नंबर स्पूफ करून जॅकलीनला फोन केला होता. आपण तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या राजकीय परिवारातील आहोत असे सुकेशने जॅकलीनला सांगितले होते.

Thugs 'Spoof' Amit Shah's Office Number To Befriend Jacqueline Fernandez

शेखर बनून घेतली जॅकलीनची भेट

कॉल स्पूफ म्हणजे मोबाईलवर कुणाचा फोन आल्यास फोन केलेल्या व्यक्तीचा नंबर न दिसता दुसराच नंबर स्क्रीनवर दिसतो. अशा प्रकारे सुकेशने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन स्पूफ करून जॅकलीनशी संपर्क साधला होता. इडीने दिलेल्या माहितीनुसार सुकेशने जॅकलीनला आपले नाव शेखर रत्न वेला असल्याचे सांगितले आणि तिची भेट घेतली होती,  


अशी अडकली जॅकलीन

ईडीने दिलेल्या माहितीनुसार सुकेश जॅकलीनवर पाण्यासारखा पैसे उधळत होता. सुकेशने जॅकलीनवर आतापर्यंत १० कोटी रुपये खर्च केले आहेत. सुकेशने जॅकलीनला सोन्याचे आणि डायमंडचे दागिने दिले होते. तसेच सुकेशने जॅकलीनला ५२ लाख रुपयांचा एक घोडा दिला होता तसेच चार पर्शियन मांजरीही दिल्या होत्या. एका मांजरीची किंमत तब्बल ९ लाख रुपये इतकी आहे.

महागड्या हॉटेल्समध्ये भेट

इतकेच नाही तर सुकेशने जॅकलीनच्या चार्टड फ्लाईटसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. सुकेशने जॅकलीनला मुंबईहून दिल्लीला चार्टड प्लेनने बोलवले होते तसेच दिल्लीहून चेन्नईला जायला चार्टड प्लेनसाठी सुकेशनेच पैसे खर्च केले होते. सुकेश आणि जॅकलीनची चेन्नईमधील महागड्या हॉटेल्समध्ये भेट झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी