विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात, आज राज्यात सभांचा महापूर

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 17, 2019 | 08:43 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यभर दररोज दिग्गजांच्या प्रचारसभा गाजत आहेत. आज दिवसभरात पुन्हा एकदा दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. कोणाच्या कुठे आज सभा होतील, जाणून घ्या,

Main leaders
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात, आज राज्यात सभांचा महापूर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. येत्या 21 तारखेला सर्वच पक्षांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहेत.
  • पंतप्रधान मोदी, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे आज महाराष्ट्रात
  • जाणून घ्या कोणाच्या कधी आणि कुठे सभा असणार आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. येत्या 21 तारखेला सर्वच पक्षांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहेत. त्यातच राज्यभर दररोज दिग्गजांच्या प्रचारसभा गाजत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शहा, योगीनाथ आदित्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बऱ्याच दिग्गजांनी राज्यभर प्रचार दौरे केले. आता केवळ उद्याचा दिवस म्हणजेच शुक्रवारपर्यंत प्रचार करता येणार असल्यानं सर्वच पक्षाकडून झंझावात प्रचार सुरू आहे. रोजच्याप्रमाणे आजही दिग्गज महाराष्ट्राच आपल्या प्रचार सभा गाजवणार आहेत. जाणून घ्या कोणाच्या कधी आणि कुठे सभा असणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज महाराष्ट्रात 3 ठिकाणी सभा होणार आहेत. दुपारी 12 वाजता बीडच्या परळीत मोदींची प्रचारसभा होईल. त्यानंतर 3 वाजता साताऱ्यात आणि संध्याकाळी 6 वाजता पुण्यात मोदी संबोधित करतील. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज सहा ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. पालघर, इंदापूर, बारामती, नाशिक या शहरात मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेचं आयोजन केलं आहे. 

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यात आज तीन ठिकाणी सभा होणार आहेत. या तीन सभा बोईसर, नालासोपारा, ठाण्यात होतील. 

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक जिल्ह्यात प्रचारसभा घेणार आहेत. सटाणा, पिंपळगाव, नांदगाव, पंचवटी, पवननगर येथे शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईतल्या लालबागमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. 

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे 

वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे आज धुळे आणि नाशिकमध्ये प्रचार करताना दिसतील. धुळे, मालेगाव, नांदगाव, निफाड, दिंडोरीत आदित्य ठाकरे यांच्या प्रचार सभा होणार आहेत. 

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे 

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे आज महाराष्ट्रात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ते आज राज्यात असतील. ज्योतिरादित्य शिंदे आज सोलापूर आणि पुण्यात सभा घेणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी