मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 14, 2022 | 07:57 IST

तुम्ही घराबाहेर पडण्याआधी वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. मध्य-हार्बर मार्गावर (Mid-Harbour route) तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक (Megablock ) घेण्यात येणार आहे. आज हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचं शेड्युल रेल्वेकडून (Railway) जाहीर करण्यात आलं आहे. तर पश्चिम आणि ट्रान्स हार्बर (West and Trans Harbor) मार्गावर ब्लॉक असणार नाही.

 Megablock : Before going out, check the local train timetable
Megablock : बाहेर जाण्याआधी पाहा लोकल रेल्वेचं Timetable  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक असणार नाही.
  • मध्य रेल्वेवर धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली आहे.

मुंबई : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. मध्य-हार्बर मार्गावर (Mid-Harbour route) तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक (Megablock ) घेण्यात येणार आहे. आज हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचं शेड्युल रेल्वेकडून (Railway) जाहीर करण्यात आलं आहे. तर पश्चिम आणि ट्रान्स हार्बर (West and Trans Harbor) मार्गावर ब्लॉक असणार नाही. त्यामुळे या दोन्ही मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेवर धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली आहे.

विविध अभियांत्रिकी कामांसाठी रविवार, १४ ऑगस्टला मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार या स्थानकादरम्यान आणि कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही. मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान दोन्ही जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.मध्य रेल्वेवर सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल सीएसएमटी-विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. पुढे पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

Read Also: त्यांची कितीही कुळ उतरली तरी शिवसेना संपणार नाही

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकलही विद्याविहार आणि सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात लोकल थांबतील. हार्बरवर कुर्ला-वाशी दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत पनवेल, बेलापूर, वाशी करीता जाणाऱ्या लोकल आणि वाशी बेलापूर, पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Read Also : कॉमनवेल्थची चॅम्पियन सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून बाहेर

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला आणि वाशी- पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल-माहीम दरम्यान दोन्ही जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री 12 ते रविवारी पहाटे चारपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या दोन स्थानकादरम्यान लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र मेगाब्लॉक नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी