CM Eknath Shinde : वारकर्‍यांसाठी टोलमाफी आणि एसटीच्या ७०० बसेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ज्या प्रमाणे गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाताना भाविकांन टोलमाफी दिली जाते त्याच प्रमाणे आषाढी वारीतही वारकर्‍यांना टोलमाफी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच पंढरपूर तीर्थस्थळाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच पंढरपूरचा विकास केला जाईल असेही शिंदे म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • ज्या प्रमाणे गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाताना भाविकांन टोलमाफी दिली जाते त्याच प्रमाणे आषाढी वारीतही वारकर्‍यांना टोलमाफी
  • पंढरपूर तीर्थस्थळाचा विकास आराखडा तयार
  • लवकरच पंढरपूरचा विकास केला जाईल

CM Eknath Shinde : मुंबई : ज्या प्रमाणे गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाताना भाविकांन टोलमाफी दिली जाते त्याच प्रमाणे आषाढी वारीतही वारकर्‍यांना टोलमाफी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच पंढरपूर तीर्थस्थळाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच पंढरपूरचा विकास केला जाईल असेही शिंदे म्हणाले.

आज प्रशासनातील अधिकार्‍यांशी बैठक घेतल्यानंतर शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंढरपूर आषाढी एकादशीची सुरूवात झाली आहे. त्यासाठी लाखो वारकरी वारीसाठी निघाले आहेत. यासाठी मी पुणे जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत बैठक घेतली आहे. प्रशासनाने वारीसाठी सर्व तयारी केली आहे त्याचा आढावा घेतला आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे ही आषाढी वारी झाली नव्हती. आता कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. वारीला लाखो वारकरी येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. वारकर्‍यांसाठी मोबईल शौचालय, रुग्णवाहिका, स्वच्छता, वाहतुकीची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, मंत्री व्हीआयपीपेक्षा वारकर्‍यांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष देण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत. यासाठी कुठलाही प्रकारचा निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

वारकर्‍यांना टोलमाफी

कोकणात ज्या प्रमाणे गणपतीसाठी जाणार्‍या गाड्यांना टोलमाफी दिली जाते त्याच प्रमाणे आषाढी वारीसाठी जाणार्‍या गाड्यांनाही टोलमाफी देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यासाठी एक स्टिकर गाडीवर लावणे अनिवार्य होणार आहे. यासाठी वारकर्‍यांनी अर्ज करून तो स्टिकर मिळवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या ७०० बसेस सोडण्यात आल्या आहेत. गरज लागल्यास आणखी गाड्या सोडण्यात येतील. पंढरपूरचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यातील इतर देवस्थानांचा जसा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, त्याच प्रमाणे पंढरपूरचाही विकास आराखडा तयार करण्यात आला आहे अशी शिंदे यावेळी म्हणाले.

खड्ड्यांमुळे अपघात होता कामा नये

ठाण्यात आज घोडबंदर भागात खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाची बैठक घेतली असून अशा प्रकारे पुन्हा अपघात होता कामा नये अशा सूचना केल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी