Sanjay Raut : एकमेकांवर आरोप करणार्‍या राऊत आणि सोमय्यांची किती आहे संपत्ती? वाचा सविस्तर

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आता संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपे केले आहेत. गेल्या काही दिवसांत आरोप प्रत्यारोपांची राळ उठत आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची मालमत्ताही जप्त केली आहे. परंत या दोन्ही नेत्यांची नेमकी संपत्ती आहे तरी किती हे जाणून घेऊया.

sanjay raut and kriit somaiya
संजय राऊत आणि किरीट सोमय्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
  • राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे तर सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
  • आता जाणून घेऊया राऊत आणि सोमय्या यांची नेमकी संपत्ती आहे तरी किती.

Sanjay Raut : मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आता संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपे केले आहेत. गेल्या काही दिवसांत आरोप प्रत्यारोपांची राळ उठत आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची मालमत्ताही जप्त केली आहे. परंत या दोन्ही नेत्यांची नेमकी संपत्ती आहे तरी किती हे जाणून घेऊया.

असोसिएट फॉर डेमोक्रेटिक या वेबसाईटर नेत्यांच्या संपत्ती आणि दाखल झालेल्या केसेसबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  किरीट सोमय्या हे भाजपचे माजी खासदार आहेत. २०१४ साली ईशान्य मुंबई या लोकसभा मतदरसंघातून सोमय्या यांचा विजय झाला होता. तर संजय राऊत हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. उमेदवारीज अर्ज भरण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराला आपल्या नावावर किती संपत्ती आहे आणि किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती द्यावी लागते.

कोट्यधीश नेते

किरीट सोमय्या आणि खासदार संजय राऊत या दोघांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. त्यात घर, जमीन जुमला, गाड्या, दागिने आणि गुंतवणुकीचा समावेश आहे.

पाच वर्षात सोमय्यांचे उत्पन्न दुप्पट

२००४ साली किरीट सोमय्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा सोमय्या यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे २ कोटी २५ लाख ९ हजार २४९ रुपयांची संपत्ती होती. २००९ साली जेव्हा त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले तेव्हा त्यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली होती. तेव्हा सोमय्या यांच्याकडे ४ कोटी ७८ लाख ८१ हजार २६९ रुपयांची मालमत्ता होती. २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांच्याविरोधात त्यांचा पराभव झाला. २०१४ साली दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ७ कोटी २१ लाख ५६ हजार २५८ रुपयांची संपत्ती होती. तर सोमय्या यांच्यावर ६५ लाख ९२ हजार ८२६ रुपयांचे कर्ज होते. किरीट सोमय्या यांच्याकडे दीड कोटी रुपयांची स्थावर तर साडे पाच कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. 


राऊत यांची संपत्ती

२००४ साली संजय राऊत पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. आधी राऊत यांची संपत्ती ४८ लाख ९४ हजार १६७ रुपये इतकी होती. २०१६ साली राऊत पुन्हा राज्यसभेसाठी खासदार झाले तेव्हा त्यांची संपत्ती १ कोटी  ५१ लाख १६ हजार २२८ रुपये इतकी होती. राऊत यांच्यावर १४ केसेस दाखल आहेत. राऊत यांच्या नावावर ३२ लाख २७ हजार २८९ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. तर १ कोटी १८ लाख ७६ हजार ३१६ इतकी स्थावर मालमत्ता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी