यवतमाळ : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघांसह वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात पर्यटकांना व्याघ्र दर्शन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह आंध्राप्रदेशातील पर्यटकांना टिपेश्वर अभयारण्य खुनावत आहे. उन्हाळ्यात शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. तर कोरोनाच्या दोन वर्षानंतर नागरिकांना घराबाहेर पडायला मिळाले आहे. याचाच परिणाम म्हणून टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. निसर्ग सौंदर्य आणि वाघांनी टिपेश्वर अभयारण्य नटलेले आहे. येथे मुंबई, पुणे, हैदराबाद, निजामाबाद, कर्नाटक यासह इतर भागातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. 148 किलोमीटर परिसरात पसरलेल्या टिपेश्वर अभयारण्यात जवळपास शंभरपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळाला आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात आर्ची या वाघिणीसह तिच्या बछड्यांनी पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. वन्यप्राण्यांसाठी असलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर वाघ पाणी पिण्यासाठी येतात. त्यांचे ठराविक ठिकाण असल्याने तेथेच ते येतात. टिपेश्वर अभयारण्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. पर्यटकांच्या गर्दीने हा परिसर फुलून जात आहे. पर्यटकांना व्याघ्र दर्शन होत आहे. आम्हाला वाघ मोर, रानडुकर इतर दूर्मिळ पक्षी दिसले. टिपेश्वर मोठे अभयारण्य असून प्रशासनाकडून पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचारीही सहकार्य करतात.
दूर्मिळ पक्ष्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मादणी गेट आहे. तेथे आम्ही पहाटे चार वाजता येतो. जंगल सफारीसाठी साडेपाच वाजता प्रवेश दिला जातो. नीलगाय, चिकांरा, वाघ बघायला मिळतात. पक्षीही बघावयास मिळतात. वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले आहे. ते प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. पर्यटकांना आर्ची व तिच्या बछड्यांचे खूब आकर्षण आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.