मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू, अपघाताचा फटका

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 16, 2022 | 11:17 IST

Traffic on Central Railway main line resumes as per Sunday schedule : दादर आणि माटुंगा दरम्यान शुक्रवार १५ एप्रिल २०२२ रोजी रात्री चालुक्य एक्सप्रेस आणि गदग एक्सप्रेस यांची धडक झाली. या अपघातात चालुक्य एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून उतरले. अपघातामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

Traffic on Central Railway main line resumes as per Sunday schedule
मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू, अपघाताचा फटका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू, अपघाताचा फटका
  • मुख्य मार्गावरील वाहतूक आज (शनिवार १६ एप्रिल २०२२) आणि उद्या (रविवार १७ एप्रिल २०२२) रविवारच्या वेळापत्रकानुसार
  • रुळावरून उतरलेल्या चालुक्य एक्सप्रेसच्या तीन डब्यांपैकी दोन डबे रुळावर परत आणण्यात आले

Traffic on Central Railway main line resumes as per Sunday schedule : मुंबई : दादर आणि माटुंगा दरम्यान शुक्रवार १५ एप्रिल २०२२ रोजी रात्री चालुक्य एक्सप्रेस आणि गदग एक्सप्रेस यांची धडक झाली. या अपघातात चालुक्य एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून उतरले. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र या अपघातामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अद्याप ही वाहतूक सुरळीत झालेली नाही. मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत/खोपोली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा ही मुख्य मार्गावरील वाहतूक आज (शनिवार १६ एप्रिल २०२२) आणि उद्या (रविवार १७ एप्रिल २०२२) असे सलग दोन दिवस रविवारच्या वेळापत्रकानुसार चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

रुळावरून उतरलेल्या चालुक्य एक्सप्रेसच्या तीन डब्यांपैकी दोन डबे रुळावर परत आणण्यात आले आहेत. पण तिसरा डबा पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणखी अवधी लागणार आहे. यामुळे आज (शनिवार १६ एप्रिल २०२२) आणि उद्या (रविवार १७ एप्रिल २०२२) असे सलग दोन दिवस मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार चालविण्याचा निर्णय झाला आहे.

अप फास्ट मार्गावरील वाहतूक सुरू आहे. कल्याणहून दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल तसेच मेल आणि एक्सप्रेस आता अप फास्ट मार्गावरून नेण्यास सुरुवात झाली आहे. डाऊन फास्ट वाहतूक भायखळा-माटुंगा मार्गे वळवली आहे. डाऊन फास्ट मार्गावरील सुरळीत होण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागण्याची शक्यता आहे. यामुळे दुपारपर्यंत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी