मुंबई : नागरिकांना नेहमी कायद्याचे पालन करावे असे सांगणारे नेते मंडळीच आता कायदे मोडू लागली आहेत. कायद्या मोडणाऱ्या खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांचा (Home Minister) देखील यात नेतेमंडळीत समावेश आहेत. वाहतुकीच्या नियमांचे (traffic rules) उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक विभागाने (Department of Transportation) त्यांच्यावर दंडात्मक कारवाई (Punitive action) केली असून या नेतेमंडळींना दंड ठोठवला आहे. सर्वाधिक दंड राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (Senior NCP leader) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांना सुमारे 27000 रुपयांचा दंड आकारला आहे. याविषयीचे वृत्त इंडिया.कॉमने दिले आहे.
अजित पवारांसह राज्यातील अनेक नेते, मंत्र्यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. मिळालेली माहिती अशी, की वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे केवळ अजित पवारच नाहीत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा देखील समावेश आहे. या नेते मंडळीवर देखील वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वाधिक दंड अजित पवार यांनी भरला आहे. अजित पवारांनी 27000 हजार रुपयांचा दंड भरला आहे. कायद्याचे पालन करा, असे आवाहन करणारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही वाहतुकीचे नियम मोडले असून वाहतूक विभागाने त्यांना 5200 रुपयांचा दंड ठोठवला आहे. दुसरीकडे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 600 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
Read Also : सीसीटीव्हीत चप्पल चोर कैद, शहाडमध्ये चप्पल चोरट्याचा धुमाकूळ
अजित पवार यांच्या खालोखाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. चंद्रकांत पाटील यांना 14200 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. परंतु चंद्रकांत पाटील यांनी अद्याप दंडाची रक्कम भरलेली नसल्याची माहिती देखील मिळाली आहे.
Read Also : पंजाबच्या पटियालात खलिस्तानवादी आणि शिवसैनिकांमध्ये राडा
वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. ती म्हणजे, वाहनांच्या PUC (प्रदूषण नियंत्रण) चाचणी दरात वाढ मोठी वाढ करण्यात आली आहे. PUC चाचणीचे दर 30 ते 35 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. राज्य परिवहन विभागाच्या परिपत्रकानुसार, 27 एप्रिलपासूनचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. दुचाकीच्या PUC चाचणीसाठी आधी 35 रुपये होते. आता त्यासाठी 50 रुपये आकारण्यात येत आहेत. पेट्रोलवरील तीनचाकीसाठी आता 100 मोजावे लागत आहेत. आधी 70 रुपये आकारले जात होते. सीएनजी, एलपीजी चारचाकीसाठी आधी 90 रुपये आकारले जात होते. आता 125 रुपये आकारले जात आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.