महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत 3 दिवस वाहतूक मार्गांमध्ये बदल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 04, 2022 | 09:18 IST

Mumbai Traffic Update, Mumbai Traffic Updates, traffic routes change for 3 days in Mumbai on the occasion of Mahaparinirvan Divas : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या पुण्यतिथी अर्थात महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Divas) मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) सोमवार 5 डिसेंबर 2022 ते बुधवार 7 डिसेंबर 2022 या 3 दिवसांकरिता वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत.

traffic routes change for 3 days in Mumbai on the occasion of Mahaparinirvan Divas
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत 3 दिवस वाहतूक मार्गांमध्ये बदल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत 3 दिवस वाहतूक मार्गांमध्ये बदल
  • मुंबईच्या निडक भागांमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी
  • 'या' ठिकाणी पार्किंग उपलब्ध

Mumbai Traffic Update, Mumbai Traffic Updates, traffic routes change for 3 days in Mumbai on the occasion of Mahaparinirvan Divas : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या पुण्यतिथी अर्थात महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvana Divas / Mahaparinirvan Divas) मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) सोमवार 5 डिसेंबर 2022 ते बुधवार 7 डिसेंबर 2022 या 3 दिवसांकरिता वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत. काही भागांमध्ये वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. या संदर्भातल्या सूचना वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केल्या आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमीला भेट देण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. ही बाब विचारात घेऊन वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

वाहतूक मार्गातील बदल आणि वाहतुकीवर निर्बंध सोमवार 5 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते बुधवार 7 डिसेंबर 2022 पर्यंत लागू असणार आहेत. 

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे मराठी संदेश Marathi Messages, Whatsapp Messages

Devendra Fadanvis : या तारखेला समृद्धी महामार्गाचे होणार लोकार्पण, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती

  1. स्वातंत्र वीर सावरकर रस्ता सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील. तथापि, स्थानिक रहिवासी येस बँक जंक्शन येथून डावीकडे वळणे घेऊन पुढे जाऊ शकतात आणि पांडुरंग नाईक रोडने राजा बडे चौकाकडे जातील.
  2. बोले रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगज चर्च जंक्शन असा एकेरी मार्ग असेल. म्हणजे बोले रोडच्या दक्षिण सीमेकडून वाहनांच्या वाहतुकीला प्रवेश नसेल.
  3. रानडे रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
  4. ज्ञानेश्वर मंदिर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
  5. जांभेकर महाराज रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
  6. केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद राहील.
  7. एम. बी. राऊत रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
  8. एलजे रोड शोभा हॉटेल ते आसावरी जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी कटारिया रोड बंद राहील.

अवजड वाहनांना प्रवेशबंदी

  1. एस. व्ही. एस रोड - माहीम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन
  2. एलजे. रोड - माहीम जंक्शन ते गडकरी जंक्शन
  3. गोखले रोड - गडकरी जंक्शन ते धनमील नाका
  4. सेनापताई बापट रोड - माहीम रेल्वे स्थानक ते वडाचा नाका
  5. टिळक पुलापासून ते एन. सी. केळकर रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

'या' ठिकाणी पार्किंग उपलब्ध

  1. सेनापती बापट मार्ग, माहीम आणि दादर पश्चिम.
  2. कामगार स्टेडियम (सेनापती बापट मार्ग).
  3. इंडिया बुल्स इंटरनॅशनल सेंटर, (सेनापती बापट रोड, एल्फिन्स्टन).
  4. वन इंडिया बुल्स सेंटर, ज्युपिटर मिल कंपाउंड, एल्फिन्स्टन वेस्ट.
  5. कोहिनूर स्क्वेअर, कोहिनूर मिल कंपाउंड, दादर.
  6. लोढा, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल.
  7. पाच गार्डन्स, माटुंगा पूर्व.
  8. एडेनवाला रोड, माटुंगा पूर्व.
  9. नथाला पारेख रोड, माटुंगा पूर्व.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी