निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा, मोटार वाहन कायद्यासंदर्भात मोठा निर्णय

मुंबई
Updated Sep 11, 2019 | 19:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

केंद्राच्या मोटार वाहन कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती देण्यात आली, असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

traffic rules central motor vechicle act diwakar rawate state act suspended latest update in marathi google batmya
मोटार वाहन कायदा महाराष्ट्रात लागू न होणार नाही 

थोडं पण कामाचं

  • केंद्राचा मोटार वाहन कायदा राज्यात होणार नाही तुर्तास लागू
  • वाहन कायद्यातील दंडाच्या रक्कमेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले पत्र
  • विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय नाही, दिवाकर रावतेंचे स्पष्टीकरण

मुंबई : केंद्राच्या मोटार वाहन कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती देण्यात आली, असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

या संदर्भात मोटार वाहन कायद्यासंदर्भात केंद्राकडे पत्रव्यवहार केला आहे. या कायद्यात दंडाची रक्कम दुप्पट तिप्पट किंवा पाच पट करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक लक्षात घेता याचा मतदारांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, यामुळे खबरदारी म्हणून राज्यात केंद्राचा कायदा लागू करण्यास तूर्तास स्थिगिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्राने मोटार वाहन कायदा लागू केला आहे. पण या कायद्यात फेरबदल करण्याचे आधिकार राज्य सरकारला दिले आहेत. कालच गुजरात राज्याने मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम कमी करून आपल्या राज्यातील नागरिकांना दिलासा दिला होता. 

 

केंद्राचा हा कायदा १ सप्टेंबर लागू राज्यात लागू व्हायला पाहिजे होता. पण या कायद्यासंदर्भात राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवला होता. त्यानंतर देशभरात या कायद्याविषयी संताप व्यक्त होत आहे, त्यामुळे या संदर्भात आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एक पत्र पाठवले असून या संदर्भात फेर विचार करावा अशी मागणी केली, असल्याचे दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले. 

सध्य़ा केंद्राकडे पत्र पाठवले असून नितीन गडकरी यांचा या संदर्भात निर्णय येत नाही तोपर्यत या कायद्या संदर्भात सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. राज्य सरकार या बाबत तटस्थ आहे.  राज्य सरकार जो पर्यंत अध्यादेश काढत नाही तोपर्यंत राज्यात हा कायदा लागू होणार नाही. असेही दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. 

या निर्णयाला विधानसभेच्या निवडणुकीचीही किनार आहे. १ सप्टेंबरला हा कायदा राज्यात लागू व्हायला हवा होता. पण तसे केले असते तर राज्यातील मतदारांची नाराजी ओठावू नये म्हणून राज्य सरकारने वेळकाढूपणा केला. तसेच आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला काही दिवस शिल्लक असताना राज्य सरकार हा कायदा लागू करून आपल्या पायावर धोंडा पाडू इच्छित नाही. दरम्यान या संदर्भात पत्रकारांनी दिवाकर रावते यांना विचारले असता, ते म्हणाले, की हा कायदा लागू करताना विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे ही स्थगिती किंवा तटस्थ भूमिका ही विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊनच घेण्यात आली आहे. त्याचा आणि विधानसभा निवडणुकीचा संबंध नसल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. 

काय आहे केंद्राचा मोटार वाहन कायदा... 

आतापर्यंत आपल्या देशात वाहतुकीचे नियम असले तरी प्रत्येकजण ते पाळताना गंभीर दिसत नाही. काहीजण वाहतुकीचे नियम पाळतात मात्र काहींना वाहतुकीचे नियम म्हणजे एक प्रकारेच जाच वाटतो. आता मात्र वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना चांगलाच जरब बसणार आहे. कारण आता वाहतुकीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. 

प्रसिद्ध मोटर वाहन दुरूस्ती विधेयक आज अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून आता दहा पट अधिक दंड वसूल केला जाणार आहे. तसेच रस्ते अपघातात हिट अँड रन प्रकरणात मृत्यू आल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबिांना दोन लाख रूपयांची मदत केली जाणार आहे. तसेच दारू पिऊन गाडी चालवल्यास त्या व्यक्तीला आता दोन हजाराऐवजी दहा हजार रूपये दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आता वाहतुकीचे नियम मोडले तर नक्कीच तुम्हाला मोठा भुर्दंड बसू शकतो.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडले होते. यावर प्रदीर्घ चर्चा झाली. चर्चेअंती १०८ विरुद्ध १३ मतांच्या फरकान हे विधेयक मंजूर करण्यात आले. याआधी हिट अँड रन प्रकरणात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास भरपाई म्हणून  २५ हजार रूपये मिळत असतं. आता या रकमेत वाढ करण्यात आली आहे. 

लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास ५ हजारांचा दंड

अनेकांना लायसन्सशिवाय गाडी चालवण्याची सवय असते. आतापर्यंत वाहतुकीचे नियम तितकेचे गंभीरपणे पाळले जात नव्हते. तसेच लायन्स नसला तरी गाडी चालवल्यास होणाऱ्या दंडाची रक्कमही तितकी जास्त नव्हती. त्यामुळे सर्रासपणे हा नियम मोडला जात असे. मात्र आता परवान्याशिवाय गाडी चालवल्यास ५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे गाडी घेऊन बाहेर निघताना लायसन्स घेतले आहे ना हे जरूर चेक करा.

गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास ५ हजारांचा दंड

अनेकांना गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याची सवय असते. मात्र ही सवय तुम्हाला चांगलीच खर्चात पाडू शकते. या सवयीमुळे तुम्हाला तब्बल ५ हजारांचा दंड भरावा लागू शकतो. 

सीट बेल्ट लावा अन्यथा १ हजार रूपये दंड

गाडीतील सीट बेल्ट लावणे आपल्या सुरक्षेसाठी असते. मात्र अनेकांना हा सीट बेल्ट लावणे गरजेचे वाटत नाही. मात्र आता असे करून चालणार नाही. गाडीतील सीट बेल्ट लावला नाही तर तुम्हाला एक हजार रूपयांचा दंड भरावा लागू शकतो. 

हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यास हजार रूपयांचा दंड

हल्ली तर टू व्हीलर वापरताना सर्रासपणे हेल्मेटचा वापर टाळला जातो. यापूर्वी हेल्मेट घातले नाही तर १०० रूपये दंड होता. मात्र आता हा दंड वाढवून सरळ १ हजार रूपये करण्यात आला आहे. तसेच तीन महिन्यांसाठी लायसन्सही जप्त केले जाणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...