Juhu Chowpatty : बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घराजवळची जुहू चौपाटी होणार चकाचक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 15, 2023 | 11:11 IST

Transformation Of Juhu Chowpatty Under Mumbai Beautification Project : अमिताभ बच्चन तसेच इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घरापासून जवळच असलेल्या जुहू चौपाटीचा कायापालट करण्याची योजना मुंबई महानगरपालिकेने तयार केली आहे.

Juhu Chowpatty
बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घराजवळची जुहू चौपाटी होणार चकाचक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घराजवळची जुहू चौपाटी होणार चकाचक
  • देशाविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेली जुहू चौपाटी
  • जुहू चौपाटीचे सुशोभीकरण

Transformation Of Juhu Chowpatty Under Mumbai Beautification Project : अमिताभ बच्चन तसेच इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घरापासून जवळच असलेल्या जुहू चौपाटीचा कायापालट करण्याची योजना मुंबई महानगरपालिकेने तयार केली आहे. ही योजना राबवून जुहू चौपाटी एकदम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या समु्द्र किनाऱ्यांसारखी चकाचक केली जाणार आहे. 

जुहू चौपाटीचे सुशोभीकरण

आकर्षक लायटिंग, प्लॅस्टिकमुक्त परिसर, पर्यटकांना आरामात बसण्यासाठी आसन व्यवस्था, मुलांना खेळण्यासाठी आकर्षक मैदानी खेळणी, ग्राफिटी वॉल, सेल्फी पॉइंट, ग्रॅनाइट फूटपाथ, हिरवीगार शोभिवंत झाडे, वाळू पसरलेला विस्तीर्ण समुद्र किनारा अशी व्यवस्था करून जुहू चौपाटीचे सुशोभीकरण केले जाणार आहे. जुहू चौपाटी सुशोभीकरण योजनेसाठी ६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

देशाविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेली जुहू चौपाटी

मुंबईची जुहू चौपाटी हे देशाविदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. जुहू परिसरात अनेक बॉलिवूड कलाकार वास्तव्यास आहेत. याच कारणामुळे जुहू चौपाटीचे पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. चौपाटीला दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. या सर्व बाबी विचारात घेऊन मुंबई सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण प्रकल्पात जुहू चौपाटीचा समावेश करण्यात आला आहे. हे सौंदर्यीकरण परदेशातील स्वच्छ आणि सुंदर निळ्याशार चौपाट्यांच्या धर्तीवर केले जाणार आहे.

जुहू चौपाटीवर एलईडी दिव्यांनी चमकणारे खांब

जुहू चौपाटीवर ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या जातील. नैसर्गिक वेलींनी तयार केलेले आणि एलईडी दिव्यांनी चमकणारे खांब बसविले जातील. पर्यटकांसाठी अद्ययावत प्रसाधनगृहाची व्यवस्था केली जाईल. संरक्षक भिंतींवर सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारी चित्रे रेखाटण्यात येतील. मुलांसाठीची आकर्षक खेळणी, रंगीबेरंगी रोषणाईत चमकणारे खांब पर्यटकांचे लक्ष वेधून घेतील. 

जुहू चौपाटीवर पहिल्यांदाच ग्राफिटी वॉल

चौपाटीवर पहिल्यांदाच ग्राफिटी वॉल तयार करण्यात येणार आहे. तसेच चौपाटीच्या परिसरात ठिकठिकाणी ‘फ्लोअर माँटिंग लाइट’ म्हणजे जमिनीत चमकल्याप्रमाणे भासणारे दिवे लावले जातील. 

मुंबई ते रायगड अवघ्या 20 मिनिटांत गाठता येणार, वाचा कसा आहे देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

Sea Links to ease Mumbai roads : नरिमन पॉइंट ते विरार एका तासात, 5 सी लिंकमुळे प्रवास होणार सुपरफास्ट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी