Transport Minister Anil Parab परिवहनमंत्री अनिल परबांचे रिसॉर्ट बेकायदेशीर

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 08, 2021 | 19:43 IST

Transport Minister Anil Parab राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बांधलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाने दिले. रिसॉर्टच्या जमिनीचा बिनशेती परवाना बेकायदेशीर आहे, असेही महाराष्ट्र शासनाने सांगितले. 

Transport Minister Anil Parab
परिवहनमंत्री अनिल परबांचे रिसॉर्ट बेकायदेशीर 
थोडं पण कामाचं
  • परिवहनमंत्री अनिल परबांचे रिसॉर्ट बेकायदेशीर
  • रिसॉर्टच्या जमिनीचा बिनशेती परवाना बेकायदेशीर
  • महाराष्ट्र शासनाने लोकायुक्तांना प्रतिज्ञापत्राद्वारे दिली माहिती

Transport Minister Anil Parab's resort is illegal मुंबईः राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बांधलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाने दिले. रिसॉर्टच्या जमिनीचा बिनशेती परवाना बेकायदेशीर आहे, असेही महाराष्ट्र शासनाने सांगितले. 

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे रिसॉर्ट बांधले आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणाची इडीने दखल घेतली होती. लोकायुक्त रिसॉर्टची चौकशी करत होते. अखेर सत्ताधारी ठाकरे सरकारने लोकायुक्तांसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्राद्वारे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे तसेच रिसॉर्टच्या जमिनीचा बिनशेती परवाना बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात आले.  

अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी वसुलीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान अनिल परब या नावाची चर्चा झाली आहे. एकीकडे ही चर्चा असताना दुसरीकडे परिवहनमंत्री अनिल परब रिसॉर्ट प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी