मुंबईकरांसाठी गुडन्यूज! तुळशी तलाव ओव्हरफ्लो

मुंबई
Updated Jul 12, 2019 | 10:11 IST

मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज आहे. या आनंदाच्या बातमीनं मुंबईकरांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे. तुळशी तलाव हा मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक आहे.

Tulsi Lake (File Image)
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! तुळशी तलाव ओव्हरफ्लो  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज आहे. या आनंदाच्या बातमीनं मुंबईकरांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे. तुळशी तलाव हा मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक आहे. त्यामुळेच तुळशी तलाव भरल्यानं मुंबईकरांच्या पाण्याची चिंता थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे. तुळशी तलाव गुरूवारी सकाळी काठोकाठ भरला. या तलावात ९७.२० टक्के पाणीसाठा जमा झाल्याची माहिती समोर येतेय. आता तुळशी तलाव भरण्यासाठी आता केवळ ६ इंच पाणीसाठा वाढणं बाकी आहे. 

या तलावाची पाणी भरण्याची एकून क्षमता १३९.०१ मीटर एवढी पातळी पाण्यानं गाठली आहे. त्यामुळे तुळशी तलाव क्षेत्रात जर असाच पाऊस पडत राहिला, तर येत्या दिवसांत म्हणजेच गुरूवारी आणि शुक्रवारी रात्रीपर्यंत हा तलाव पूर्ण भरण्याची शक्यता आहे. ही बातमी मुंबईकरांसाठी नक्कीच आनंदाची असेल. मुंबईला पाणी पाणीपुरवठा करणारे तलाव भरण्याची सुरूवात या तलावापासूनच होत असते. 

भातसा तलावातून मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा 

मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळशी या तलावांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष म्हणजेच ३७५ कोटी लीटर एवढा पाण्याचा पुरवठा होत असतो. भातसा तलावातून मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा केला जातो. तर तुळशी आणि विहार या तलावांतून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो. सद्यस्थितीत या सर्व तलावांमध्ये ३८ टक्के एवढा पाणीसाठी जमा झाला आहे. सर्व तलावांमधली पाणीसाठी मिळून ५ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर एवढा होतो. 

बोरिवलीतलं प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेला हा तुळशी तलाव दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील संततधार पावसानंतर पूर्ण क्षमतेनं भरतो. मात्र गेल्यावर्षी सुद्धा हा तलाव जुलै महिन्याच्या १० ते १२ दरम्यान ओव्हरफ्लो झाला होता. सर्व तलावांच्या तुलनेत तुळशी तलाव हा सर्वाधिक आधी ओव्हरफ्लो होतो. त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू असेल तर तानसा तलाव भरतो. मात्र विहार तलाव छोटा असला तरी तो जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या सुरूवातीला भरतो.

यंदा पावसानं खूप उशीरानं एन्ट्री केली. त्यामुळे जून महिना हा कोरडाच गेला. त्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवला होता. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जोरदार  पाऊस सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! तुळशी तलाव ओव्हरफ्लो Description: मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज आहे. या आनंदाच्या बातमीनं मुंबईकरांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे. तुळशी तलाव हा मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
'धनंजयने फेसबुकवरची ती पोस्ट डिलीट का केली? त्याने आता तरी खोटं बोलू नये', पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
'धनंजयने फेसबुकवरची ती पोस्ट डिलीट का केली? त्याने आता तरी खोटं बोलू नये', पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhansabha Election: हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; पाहा राज्यभरात किती टक्के मतदान
Vidhansabha Election: हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; पाहा राज्यभरात किती टक्के मतदान
[VIDEO]: धनंजय मुंडे म्हणतात, 'मला असं वाटलं हे जग सोडून जावं'
[VIDEO]: धनंजय मुंडे म्हणतात, 'मला असं वाटलं हे जग सोडून जावं'
'या' गावातील एकाच मतदाराने केले मतदान, का झालं असं जाणून घ्या... 
'या' गावातील एकाच मतदाराने केले मतदान, का झालं असं जाणून घ्या... 
टाइम्स नाऊ मराठी एक्झिट पोल : कोण जिंकणार कोण होणार पराभूत
टाइम्स नाऊ मराठी एक्झिट पोल : कोण जिंकणार कोण होणार पराभूत
धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा धिक्कार, त्यांनी किमान नात्याची जाण ठेवायला हवी होती: मुख्यमंत्री 
धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा धिक्कार, त्यांनी किमान नात्याची जाण ठेवायला हवी होती: मुख्यमंत्री 
टाइम्स नाऊ मराठीचा एक्झिट पोल, पाहा कोणाची येणार सत्ता
टाइम्स नाऊ मराठीचा एक्झिट पोल, पाहा कोणाची येणार सत्ता
Maharashtra Election 2019: ते 200 च्या पार जाणार नाही, मनोहर जोशींचा महायुतीला घरचा आहेर 
Maharashtra Election 2019: ते 200 च्या पार जाणार नाही, मनोहर जोशींचा महायुतीला घरचा आहेर