लग्नाचे अमिष दाखवून टीव्ही अभिनेत्रीवर वारंवार बलात्कार, पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई
Updated Mar 06, 2021 | 16:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका टीव्ही अभिनेत्रीने मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्थानकात एका इसमाविरुद्ध खटला दाखल केला आहे. तिचा आरोप आहे की, त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

Rape
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्रीने ओशिवारा पोलीस स्थानकात दाखल केली तक्रार
  • तिच्या तक्रारीवरून भारतीय दंडसंहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल
  • प्रकरणाचा तपास चालू असल्याची पोलिसांची माहिती

मुंबई: एका अभिनेत्रीला (Actress) लग्नाचे अमिष (pretext of marriage) दाखवून एका इसमाने वारंवार बलात्कार (rape) केल्याची घटना समोर येत आहे. सदर अभिनेत्रीने मुंबईच्या (Mumbai) ओशीवारा पोलीस स्थानकात (Oshiwara police station) तक्रार (complaint) दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला आहे. ज्यानंतर याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपासाला केली सुरुवात

आपल्या तक्रारीत या अभिनेत्रीने सांगितले की, संबंधित इसमाने तिला लग्न करण्याचे अमिष दाखवून तिचा अनेकदा लैंगिक छळ केला आहे. पोलिसांनी तिच्या साक्षीनंतर याप्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 (2) (n) (बलात्कार), 406 (विश्वासघात), 420 (फसवणूक), 504 (अपमान), 506 आणि 323 (मुद्दाम हानी पोहोचवणे) याअतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि एएनआयने दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी ते पुढील तपास करत आहेत.

विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर झाली ओळख

आणखी एका अभिनेत्रीने ओशीवरा पोलीस स्थानकात एका वैमानिकाने लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर काहीच आठवड्यांनी अशाच प्रकारची एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, तिची या इसमाची ओळख विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर झाली. नंतर त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला.

असाच आणखी प्रकार आला उघडकीला

आणखी एका प्रकरणात उत्तर प्रदेशातील महोबा शहरात तीन लोकांनी एका 20 वर्षीय युवतीचा सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संशयितांनी या गुन्ह्याचा व्हिडिओही तयार करून त्यावरून तिला ब्लॅकमेल केले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी याप्रकरणातील तिन्ही संशयितांना गांधीनगर भागातून अटक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी