मुंबईतही कोरोना व्हायरस, दोन रुग्ण आढळले 

मुंबई
Updated Mar 11, 2020 | 21:41 IST

पुण्यापाठोपाठ मुंबईत देखील कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या दोन्ही रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

two coronavirus patients found in mumbai also
मुंबईतही कोरोना व्हायरस, दोन रुग्ण आढळले   |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई: गेले काही दिवस चीनसह अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आता मुंबईमध्ये येऊन ठेपला आहे. कारण मुंबईत दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. दोनही रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. त्यानंतर दोनही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता मुंबईतही कोरोनाने धडक दिली आहे. 

मुंबईतील सहा संशयित रुग्णांपैकी दोन रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याने आता त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोन्ही रुग्णांचे रक्ताचे नमुने कस्तुरबा हॉस्पिटलच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत तपासण्यात आले. 

पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण 

देशभरात विदेशातून कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 59 वर पोहोचली आहे. त्यातच आता भीती खरी ठरली ती म्हणजे, महाराष्ट्रातही या व्हायरसनं शिरकाव केला आहे. दुबईहून आलेल्या पुण्यातली दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय दुबई प्रवासातील सहप्रवासी आणि या दाम्पत्याला मुंबईहून पुण्यापर्यंत ज्या ओला टॅक्सी चालकाने आणले त्याला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या पाचवर झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, हे पाच रुग्ण अनेकांना भेटले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुबई येथे जाऊन आलेल्या एका दाम्पत्यासह त्यांची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा टॅक्सी चालकाचीही पुण्यात तपासणी करण्यात आली. हे दाम्पत्य यवतमाळचे रहिवासी आहेत. सध्या पुण्याला असलेल्या या तिघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा. अशी सतर्कता बाळगावी. असं आवाहनही आरोग्यमंत्री यांनी केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...