Dahi Handi : दहीहंडीतील दोन जखमी गोविंदांची मृत्यूची झुंज सुरूच, एका मृत्यूप्रकरणी आयोजकाला अटक

दहीहंडीत थर लावताना संदेश दळवी या तरुणाचा खाली पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आयोजक रियाझ शेख यांना अटक करण्यात आली आहे. आता दहीहंडीच्या वेळी थर लावताना जखमी झालेले दोन गोविंदा मृत्यूशी झुंज देत आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

dahi handi
दहीहंडी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दहीहंडीत थर लावताना संदेश दळवी या तरुणाचा खाली पडून मृत्यू झाला होता.
  • त्यानंतर आयोजक रियाझ शेख यांना अटक करण्यात आली आहे.

Dahi Handi Injured Govinda : मुंबई : दहीहंडीत (dahi handi) थर लावताना संदेश दळवी (sandesh dalavi) या तरुणाचा खाली पडून मृत्यू (death) झाला होता. त्यानंतर आयोजक रियाझ शेख यांना अटक करण्यात आली आहे. आता दहीहंडीच्या वेळी थर लावताना जखमी झालेले दोन  गोविंदा मृत्यूशी झुंज देत आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (two injured govinda still serious treatment undergoing in hospital mumbai)

अधिक वाचा : Nitesh Rane : उत्तर प्रदेशच्या लव जिहाद कायद्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करणार का? नितेश राणेंच्या प्रश्नावर गृहमंत्री फडणवीस यांनी दिले उत्तर


भांडूपचा रहिवासी असलेला २३ वर्षीय प्रथमेश परब दहीहंडीचा सराव करताना १७ ऑगस्टला पडला. त्याला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो घरी आल्यानंतर जिममध्ये गेला आणि अर्ध्या तासात येतो असे त्याने आईला कळवले होते. परंतु रात्री दीड वाजता त्याच्या मित्राचा आईला फोन अला की दहीहंडीचा सराव करताना पडला आहे आणि त्याला मुलुंडच्या रुग्णालयात दाखल कराण्यात आले आहे. मुलुंडच्या रुग्णालयातून प्रथमेशला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. प्रथमेशला उंचीची भिती वाटते, म्हणून खालच्या थराला असतो. दहीहंडीचा सराव करताना वरचा थर त्याच्या अंगावर कोसळला आणि त्यात तो जखमी झाला. प्रथमेश जखमी झाल्यानंतर त्याच्या टीमने दहीहंडी साजरा न करण्याचे ठरवले होते. परंतु प्रथमेशने विनंती केल्यावर त्याचा ग्रुप दहीहंडी फोडायला गेले.  प्रथमेश पडल्यानंतर त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. सायन रुग्णालयाचे डॉक्टर मोहन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेशच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत तसेच सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

अधिक वाचा : गर्दी कमी करण्यासाठी येरवडा कारागृहातून महिनाभरात ४१८ कैद्यांची सुटका

तर दुसरीकडे प्रथमेश सावंत या २१ वर्षीय तरुणावर केईम रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रथमेशच्या आई वडिलांचे निधन झाले असून सध्या तो मावशीकडे राहतो. प्रथमेश डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. दहीहंडीच्या वेळी प्रथमेश ७ व्या थरावरून कोसळला. त्याला तत्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर प्रथमेशला केईम रुग्णालयात हलवण्यात आले. केईम रुग्णालयाच्या डॉ. संगीता रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश सध्या शुद्धीवर असून आयसीयूत आहे.

अधिक वाचा : Nashik Crime: जीव की प्राण असलेल्या नातवानेच संपवलं आजीला, हातातल्या कड्यानं डोळ्यावर केले घाव; आजी जागीच ठार

 कुर्ल्याचा रहिवासी असलेल्या संदेश दळवी दहीहंडीचा थर लावताना खाली पडला, त्याला तत्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर नानावटी रुग्णलयात हलवण्यात आले आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दही हंडी आयोजक राष्ट्रवादीचे नेते रियाझ शेख यांना अटक करण्यात आली आहे. आयोजनावेळी सुरक्षेसंबंधित कुठलीच उपाययोजना न केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : सोलापुरातील गणपती बाप्पाला रडताना पाहण्यासाठी भाविकांची मंदिरात रांग; नारळ, फळे अर्पण करण्यासाठी नागरिकांची पळापळ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी