भाजप- राष्ट्रवादीच्या शपथविधीनंतर उदयनराजेंवरील 'हे' मीम्स व्हायरल

मुंबई
पूजा विचारे
Updated Nov 23, 2019 | 16:05 IST

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता सगळीकडे मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत.

udyanraje bhosle
भाजप- राष्ट्रवादीच्या शपथविधीनंतर उदयनराजेंवरील 'हे' मीम्स व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter

आज शनिवारी सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता सगळीकडे मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातच एक माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर एक मीम्स बराच व्हायरल होत आहे. 

उदयनराजे यांनी *राष्ट्रवादी-भाजपला विचारला प्रश्न...

तुम्हाला जर एकत्र यायचे होते तर मला कशाला पाडलं

अशा प्रकारचं मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बऱ्याच नेत्यांची मेगाभरती भाजपमध्ये झालेली पाहायला मिळाली. तेव्हा उदयनराजे भोसले यांनीही राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीच राज्यात विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक देखील घेण्यात आली होती. त्यामुळे विधानसभेसोबतच सातारा जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणुकीकडे देखील सर्वांचंच लक्ष होतं. 

त्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा प्रचंड मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील हे जायंट किलर ठरले. श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा ८७, ७१७ मतांनी पराभव केला. पाटील यांना ६,३६६, २० एवढी मतं मिळाली. भाजपच्या उदयनराजेंना ५४८९०३ एवढं मताधिक्य मिळालं आहे. एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर साताऱ्यातून १ लाख २८ हजारांच्या मताधिक्यानं विजयी झाले होते.  माझं मताधिक्य हे जेवढं अंतर जमीन आणि आस्मानमध्ये आहे तेवढं असणार आहे, असा दावा त्यांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर हे मीम्स सध्या व्हायरल होत आहेत. 

शिवसेनेवरील मीम्स 

नोटबंदी रात्री
जीएसटी रात्री 
सर्जिकल स्ट्राइक रात्री
आरे ची कत्तल रात्री

आणि


शिवसेनेचा गेम पण रात्री

रात्रीस खेळ चाले 

आणखी काही व्हायरल मीम्स

memes

नदीजोडप्रकल्पाला आज यश मिळाले ! 
 ' प्रत्येक धरणातल्या पाण्याचे ' आजपासून  गंगाजलात रूपांतर झाले आहे  ! 

सर्व भक्तांनी गंगादर्शन व गंगास्नानाचा लाभ घ्यावा व ' नमामि गंगे ' ह्या श्लोकाचा दररोज शंभर वेळा जप करावा .

---------

  • बहुमत सिद्ध नाही झाल्यास वर्ल्ड कप 2019 चे 288 सामने पुन्हा खेळवले जाणार....
  • आत्ता बहुमत सिद्ध करण्यावरून शरद पवार vs अमित शाह यांच्यात थेट सामना #145 to win
  • हे कस झाल याद्या झाल्या.. वराड टेम्पोत बसल आणि नवरी पळून गेली 
  • भाजपा पहिल्या दिवसापासून Wait & Watch अस म्हणत होतं, आज कळले Watch म्हणजे "घड्याळ" होतं...

ajit pawar memes

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

सकाळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी