कोश्यारींच्या विधानाने उदयनराजे संतापले म्हणाले, "झेपत नसेल तर पदाचा राजीनामा द्या, वरिष्ठांनी अ‍ॅक्शन घेतली नाही तर..."

Udayanraje Bhosale on Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. आता उदयनराजे भोसले यांनीही या विषयावरुन संताप व्यक्त केला आहे. 

Udayanraje Bhosale reaction on bhagat singh koshyari statement about chhatrapati shivaji maharaj read in marathi
उदयनराजे भोसले (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: ANI

Udayanraje Bhosale: उदयनराजे भोसले म्हणाले, काय बोलणार या विषयावर... मीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व लोकं आता विचारात पडले आहेत की, अशा प्रकारच्या लोकांना राज्यपाल किंवा प्रवक्ते पदावर कसे बसवले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत त्यांनी कदाचित वाचन केलं नसावं. अनेकदा ते अशी विधाने करतात, महाराजांच्या बद्दल किंवा इतरांबद्दल... भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदावर आहेत आणि ते एक मोठं सन्मानाचं पद आहे. त्या पदावर बसून ते पद सांभाळता येत नसेल तर अशा लोकांना त्या पदावरुन बाजूला करणे योग्य आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Udayanraje Bhosale reaction on bhagat singh koshyari statement about Chhatrapati Shivaji Maharaj read in marathi)

या संदर्भात अमित शहा, मोदींसोबत बोलणार आहात का? यावर उदयनराजे भोसले यांनी पुढे म्हटलं, मी या संदर्भात पत्र देणार आहे. यांच्या अशा प्रकारच्या विधानाने काही कारण नसताना द्वेषाची भावना समाजात पसरत आहे. मी पत्र तर देणार आहे. त्यावर काही कारवाई झाली नाही तर लोकं अ‍ॅक्शन घ्यायची ते घेतीलच...

हे पण वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात

उदयनराजे भोसले यांनी टीव्ही 9 वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलं, राज्यपालपद हे सन्मानाचं पद आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचीच नाही तर देशाची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत विधान करण्यापूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा इतिहास वाचला तर बरं होईल. ही पहिली वेळ नाहीये. आतापर्यंत भगतसिंह कोश्यारी यांनी वेगवेगळ्या प्रकारची विधाने केली आहेत. या लोकांवर अ‍ॅक्शन घ्या असे पत्र मी अमित शहा यांना लिहिणार आहे.  

हे पण वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात

उदयनराजे भोसले यांनी पुढे म्हटलं, या लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली असावी, त्यांना विस्मरण होत असावे. किंवा त्यांच्या अंगात विकृती असावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत सर्वांच्या मनात प्रेम, अस्मिता आहे. त्यामुळे महाराजांच्या बाबत बोलत असताना जबाबदारीने बोललं पाहिजे. अनेकांची मने दुखावली जातात. त्यामुळे अनेकांचा उद्रेक होतो. या उद्रेकामुळे कदाचित त्यांचा अंतही होऊ शकतो. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध तर आहेच. राज्यपाल पद हे मोठे आहे आणि भगतसिंह कोश्यारी यांना झेपत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यायला हवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी