उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार? दिपाली सय्यदनं भाजपचे मानले आभार, ट्विटमुळं चर्चांना उधाण

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 17, 2022 | 11:33 IST

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 50 आमदारांना सोबत घेत बंड केलं आणि भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. विचारामधील मतभेदामुळे शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडली. या कारणामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार का? असा सवाल उपस्थित होत होता.

Uddhav Thackeray and Eknath Shinde will meet each other
नवा ट्विस्ट, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट होणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मध्यस्थी केल्याबद्दल भाजपचे धन्यवाद मानले.
  • दिपाली सय्यद यांच्या या ट्विटनंतर अनेक चर्चा सुरू

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 50 आमदारांना सोबत घेत बंड केलं आणि भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. विचारामधील मतभेदामुळे शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडली. या कारणामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार का? असा सवाल उपस्थित होत होता.

परंतु या प्रश्नचं उत्तर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी दिले आहे. भेटीच्या शक्यतेचं ट्विट केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.  उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्यासंदर्भात शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्वीट केलं आहे. या भेटीसाठी मध्यस्थी केल्याबद्दल भाजपचे धन्यवाद देखील दिपाली सय्यद यांनी मानले आहेत.

दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्वीट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे. 

दिपाली सय्यद यांच्या या ट्विटनंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या म्हणण्यानुसार भाजपसोबत जाण्यास तयार होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतो. दिपाली सय्यद यांनी भाजपनेही दोघांची भेट घडवून आणण्यासाठी मदत केल्याचा उल्लेख केला आहे.

सोबतच त्यांनी एक ट्वीट त्याआधीही केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, लवकरच आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात दिसावेत, शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी