मोदी शहा विरोधात उद्धव ठाकरे पुकारणार यल्गार, मार्चमध्ये उचलणार मोठे पाऊल 

Uddhav Thackeray, मुंबई :  शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले असून आता त्यांनी विरोधी पक्षाची मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात यल्गार पुकारणार आहे.

Uddhav Thackeray calls out against Modi Shah, will take steps in March
मोदी शहा विरोधात उद्धव ठाकरे पुकारणार यल्गार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले
  • आता त्यांनी विरोधी पक्षाची मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात यल्गार पुकारणार आहे.

Uddhav Thackeray, मुंबई :  शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले असून आता त्यांनी विरोधी पक्षाची मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात यल्गार पुकारणार आहे.  मार्च महिन्याचा अखेरीस देशातील सर्व विरोधी पक्षांची मुंबईत महासभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Uddhav Thackeray calls out against Modi Shah, will take steps in March)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन गटातील वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचे चिन्ह आणि नाव दिले आहे. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाकडून विविध प्रतिक्रिया येत आहे. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली.  त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जे झाले ते इतर पक्षांबाबतही होऊ शकते. त्यामुळे इतर पक्षांनीही आत्ताच सावध होणे गरजेचे आहे. नाही तर 2024 मध्ये देशात हुकूमशाही सुरू होईल. 

अधिक वाचा : कडू-कडू कारल्याचे आहेत गोड-गोड आरोग्यदायी फायदे

या संदर्भात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

अधिक वाचा :  पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा हे Indian superfoods

या संदर्भात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून मोदी आणि शहा यांच्या विरुद्ध यल्गार पुकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा एक भाग म्हणून मार्च महिन्याच्या अखेरीस मुंबईत सर्व विरोधी पक्षांची मिळून एक भव्य सभा घेणार असल्याचे समोर येत आहे.   यापूर्वी महापालिका निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरे गटाकडून समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि आम आदमी पक्षाशी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या सर्वांनाही यात समाविष्ट करण्यात येईल. तसेच दक्षिणेतील तेलंगणाचे मुख्यमंत्री टीआर. चंद्रशेखरराव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनाही या सभेला निमंत्रण देण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी