Uddhav Thackeray Interview : एकनाथ शिंदे यांची हाव संपतच नाही, आता ते शिवसेना गिळायला निघालेत - उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांची हाव संपतच नाही आणि आता ते शिवसेना गिळायला निघाले आहेत अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच ज्या ठाण्याने पहिल्यांदा शिवसेनेला सत्ता दिली त्याच ठाण्यात अशी बंडखोरी होणे हे दुर्दैवी आहे अशी उद्धव ठाकरे म्हणाले. 

uddhav vs shinde
शिंदे वि. ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला
  • एकनाथ शिंदे यांची हाव संपतच नाही
  • आता ते शिवसेना गिळायला निघाले आहेत अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Uddhav Thackeray Interview : मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले. एकनाथ शिंदे यांची हाव संपतच नाही आणि आता ते शिवसेना (Shivsena) गिळायला निघाले आहेत अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच ज्या ठाण्याने (Thane) पहिल्यांदा शिवसेनेला सत्ता दिली त्याच ठाण्यात अशी बंडखोरी होणे हे दुर्दैवी आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray criticized cm eknath shinde in latest samana interview)

अधिक वाचा : "विधानपरिषदेत एका पक्षाचे तीन आमदार फुटले, तीन मतांसाठी २१ कोटी" अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, यापूर्वीच जर मी जर मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर त्यांनी पुढे काय केले असते? शिंदे यांची भूकच भागत नाही.  आता शिंदे यांना मुख्यमंत्रिपद हवे आणि पक्षप्रमुखपदही हवे आहे. आता शिंदे हे आपली बरोबरी शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत करणार आहेत का ? ही राक्षसी महत्त्वाकांक्षा असून याला हाव म्हणतात असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना सारख्या पक्षाने एकनाथ शिंदे यांना राजकारणात जन्म दिला. शिवसेना हा पक्ष आपल्याला मातेसमान आहेत आहे. आता हेच एकनाथ शिंदे संपूर्ण शिवसेना गिळायला निघाले आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

अधिक वाचा : MNS: उद्धव ठाकरेंना मोठा शह देण्यासाठी राज ठाकरेंची प्रचंड मोठी खेळी, म्हणाले...

माझ्या मंत्र्याने दिवे लावले

नगरविकास खाते हे मुख्यमंत्र्याकडे असण्याचा प्रघात आहे. हे खाते तसे मलईदार म्हटलं जातं. परंतु मी मलई खाण्यासाठी आलो नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्याकडे सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान सारखी खाते होती. माझ्या मंत्र्याने दिवे लावले म्हणून हे खाते माझ्याकडे आले असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमदारसंजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. त्यांचे नाव पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणात आले होते. त्यामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर हे खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आले होते.

अधिक वाचा : CM Eknath Shinde : भाजपसोबत युती झालेली पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी