ठाकरे सरकारची फलंदाजी जोरदार, मंत्रालय रोज सुरू राहणार?

मुंबई
Updated Dec 14, 2019 | 12:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

मंत्रालयाचे कामकाज हे दररोज सुरू राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारने घेऊ शकते. मंत्रालयीन कामकाज रोज सुरू राहिल्याने जनतेला त्यांच्या समस्या मांडायला जास्त दिवसांचा अवधी मिळेल.

ठाकरे सरकारची फलंदाजी जोरदार, मंत्रालय रोज सुरू राहणार
Uddhav Thackeray decided to keep Mantralay work open for all days  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • मंत्रालयाचे कामकाज हे दररोज सुरू राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकार घेऊ शकते
  • उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आतापर्यंत ते दररोज मंत्रालयात उपस्थित राहत आहेत.
  • दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे.

मुंबई: मंत्रालयातील कामकाज हे आठवड्यातील साधारण ३ ते ४ दिवस सुरू होते. सर्व मंत्री हे केवळ मंगळवार, बुधवार आणि गुरूवार हे तीन दिवस मंत्रालयात उपस्थित राहत होते. मात्र आता मंत्रालयाचे कामकाज हे दररोज सुरू राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारने घेण्याच्या तयारीत आहे.

मंत्रालयीन कामकाज रोज सुरू राहिल्यास जनतेला त्यांच्या समस्या मांडायला जास्त दिवसांचा अवधी मिळेल. मंत्रालयात दररोज महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणांहून जनता आपल्या समस्या घेऊन येत असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यास या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत नक्कीच होईल. उद्धव ठाकरे हे मुंबईचेच असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आतापर्यंत ते दररोज मंत्रालयात उपस्थित राहत आहेत. परिणामी इतर सहा मुख्य मंत्र्यांना त्यांच्यासोबत कार्यालयात उपस्थित राहून काम करावे लागत आहे. तसेच दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. राजकीय दौरे आणि इतर कार्यक्रम वगळता मुख्यमंत्री रोज आपल्या मंत्रालयातील कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेस आघाडीच्या काळात दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होत. तसेच मंगळवार, बुधवार आणि गुरूवार असे तीनच दिवस मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहत असे. परिणामी इतर दिवशी मंत्रालयातील गर्दी कमी होत कामकाजही अतिशय संथ गतीने होत होते. देवेंद्र फडणवीस हे मूळचे नागपूरचे असल्याने ते वारंवार विदर्भ दौऱ्यावर होते. त्यामुळे मंत्रालयात तशी मंत्र्यांची रेलचेल कमीच होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे असल्याने ते रोज मंत्रालयात हजेरी लावतील असे बोलले जात आहे. परिणामी मुख्यमंत्री आणि इतर मंत्री रोज मंत्रालयात उपस्थित राहिल्याने नागरिकांची वर्दळ वाढून कामकाजही झपाट्याने होईल असा अंदाज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी