Uddhav Thackeray Interview : म्हणून देवेंद्र फडणवीसांचे मुंबईवर प्रेम नाही, उद्धव ठाकरे यांची खरमरीत टीका 

नव्या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली असून पुन्हा आरे कारशेडला मंजूरी दिली आहे. यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांचे मुंबईवर प्रेम नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

Uddhav Thackeray Interview
उद्धव ठाकरे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नव्या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली असून पुन्हा आरे कारशेडला मंजूरी दिली आहे.
  • यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
  • फडणवीस यांचे मुंबईवर प्रेम नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

Uddhav Thackeray Interview : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मेट्रोच्या आरे कारशेडला  (Aarey Metro Car Shed)स्थगिती दिली होती. तसेच कांजूरमार्ग (Kanjurmarg) येते नव्या कारशेडला मंजूरी दिली होती. आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस यांचे सरकार (Shinde Fadanvis Government) स्थापन झाले आहे. त्यामुळे नव्या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली असून पुन्हा आरे कारशेडला मंजूरी दिली आहे. यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांचे मुंबईवर (Mumbai) प्रेम नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  (Uddhav Thackeray ex cm criticized deputy cm devendra fadanvis over aarey metro car shed )

अधिक वाचा : Uddhav Thackeray Interview : एकनाथ शिंदे यांची हाव संपतच नाही, आता ते शिवसेना गिळायला निघालेत - उद्धव ठाकरे

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सामनासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. आरे  कारशेडप्रकरणी उद्धव ठाकरे म्हणाले की,  शिंदे फडणवीस सरकारने आरे कारशेडवर पुन्हा काम सुरू केले आहे, माझे पुन्हा आवाहन आहे की माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाचा घात होईल असा निर्णय घेऊ नका. कांजूरची ओसाड जागा आहे तिथे कारशेड करावे, त्यामुळे या मेट्रोचा पुढे विस्तार करता येईल आणि तसेच आज ना उद्या कांजूरमध्ये कारशेड करावंच लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.  फडणवीस मुंबईचे नाही म्हणून त्यांना या शहरावर प्रेम नाही,  मुख्यमंत्री हा संपूर्ण महाराष्ट्राचा असतो तो फक्त मुंबई, ठाणे किंवा नागपूरचा नसतो. मी मुख्यमंत्री असताना एक समाधानकारक गोष्ट केली की, जेवढी वनक्षेत्रं आहेत ती वाढवण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ८०० एकर जंगल घोषित केले आहे. पर्यावरण महत्त्वाचे आहे अन्यथा आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Chandrakant Patil:‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भाजपची खदखद आली समोर
 

मग युतीला अर्थ काय?

या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरही टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या प्रमाणे एका रावणाचा जीव त्याच्या बेंबीत होता त्याच प्रमाणे भाजपचा प्राण आता मुंबईत आहे. त्यांनी दिल्ली काबीज केली आता त्यांना मुंबईवर राज्य करायचे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच बाळासाहेब असताना भाजप शिवसेना युती झाली होती, तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की तुम्ही देश सांभाळा आम्ही  महाराष्ट्र सांभाळतो. पण आता भाजप शिवसेनेला ना देशात पसरू देत आहे ना महाराष्ट्रात. आम्हाला लाल किल्ल्यावर भाषण देण्याची हौस नाही पण महाराष्ट्र आणि  मुंबईतही आम्हाला जागा देणार नसाला तर मग या युतीला अर्थ काय? असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Aaditya Thackeray: 'मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नाही' ठाकरेंची शिंदे गटासोबत चर्चेची तयारी

पालिकेच्याच नव्हे तर विधानसभेच्या निवडणूका घ्या

राज्यात फक्त मुंबई, ठाणे आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच नव्हे तर विधानसभेच्याही निवडणूका घ्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होईल हे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते ते आजही अपूर्ण आहे. मी मुख्यमंत्री होईन असे वचन मी दिले नव्हते. पण एक सामान्य शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री होईल. वचन पूर्ण केल्यानंतरही मी दुकान बंद करून बसणार आहे का ? शिवसेना मला वाढवायची आहे, ती जर वाढवणार नसेल तर मी पक्षप्रमुख होण्याला काही अर्थ नाही असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. 

Suhas Kande: शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर प्रचंड खळबळजनक आरोप

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी