Uddhav Thackeray । मुंबई : दुसऱ्याच्या पक्षाचे नाव चोरणे हे बरोबर नाही, जे काही सुरू आहे, ते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नी आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन बैठकींचा धडका लावला आहे. (Uddhav Thackeray gave a target of 50 lakhs member Registration to Shiv Sainiks)
अधिक वाचा : हॉट अभिनेत्री सान्या अशी झाली ग्रॅज्युएट पास!
आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत उद्धव ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला आहे. ते म्हणाले, शिंदे गटातील आमदार आणि खासदारांचे जे काही सुरू आहे, त्यांचा सामान्य जनतेच्या मनात राग आहे. आगामी निवडणुकीत हा राग दिसून येणार आहे. त्यांनी हिंदुत्व मांडून दाखवावं आणि मत मिळवून समोरच्याला हरवून दाखवावं, आहे हिंमत, कारण यांच्यामध्ये ती नाही आहे. कारण हे खरे मर्दच नाही आहेत. दुसऱ्याचा पक्ष चोरायचा, तो चोरला जात नाही, दुसऱ्याच्या पक्षाचे नाव चोराचे ते चोरले जावू शकत नाही. हे चोराचे काम आहे. आता जे काही सुरू आहे ते चोराच्या उलट्या बोंबा आहेत.
या चोरांना किती बोंबलायचे ते बोंबलू द्या. त्याचा काही उपयोग होणार नाही. हा खेळ काही दिवस चालेल. आजसुद्धा मी सांगतो, तुम्ही निष्ठेने या ठिकाणी थांबले आहात. तसं पाहिलं तर आमदार आणि खासदारांनाही मी डांबून ठेवू शकलो असतो. पण त्याला लोकशाही नाही म्हणणार. तुम्ही मनाने तुटले असाल तर मी किती दिवस तुम्हांला डांबून ठेऊ शकतो. त्या गोष्टीवर माझा विश्वास नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी या ऑनलाइन बैठकीत सांगितले.
अधिक वाचा : श्वेता तिवारीचा देसी स्वॅग, तुम्हीही व्हाल घायाळ
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी आज सुद्धा अनेक शिवसैनिकांना भेटलो. त्यांना सांगितले, ज्यांना जायचे त्यांनी जरूर जावे. नाटकं करू नका. उगाच टीव्हीवर जाऊन रडण्याची ढोंग करू नका. तुम्हांला ज्यावेळी मिळाले, तेव्हा तुम्ही आनंदाने भोगले. शिवसेनेच्या विरुद्ध कारवाया करायच्या त्याही केल्यात. तर आता हे रडण्याचे ढोंग करू नका. शिवसैनिक तुम्हांला पूरतं ओळखून आहे, असा टोला रडणाऱ्या रामदास कदम यांना लगावला.
यावेळी शिवसैनिकांना दिलेल्या टार्गेटबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हांला जे काम दिले आहे. प्रतिक्षापत्रक तयार करून घेण्याचे, आपले सदस्यांचे रजिस्ट्रेशन करून घेण्याचे. आता नोंदणी वाढविण्याचे काम तुम्हांला करायचे आहे. अक्कलकुवामध्ये एका मतदार संघात अडीच हजार लोकांच्या नोंदणी झाल्याची मला माहिती मिळाली. त्यावेळी मी सांगितलं की, मला अडीच हजार नको 5 हजार नोंदणी हवी आहे. जे पाच हजार सांगताहेत त्यांना मी 10 हजारांचे टार्गेट देतो आहे. हे काम सहज होऊ शकतं. जर शिवसैनिक चवताळून उठला तर तो जे काही करू शकतो, तो दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता करू शकत नाही. याची मला खात्री आहे. आज हे सर्व आपल्या मूळावर घाव घालायला आले आहेत. आपण ज्यांना आपले मानत होते. ते एवढे सुडाने पेटले आहेत की शिवसेना संपली पाहिजे. या भाजपच्या डावाला बळी पडून ते आपल्याच मुळावर घावल घातले आहेत.
अधिक वाचा :
माझ्याकडून त्यांनी काही मागितलं असतं, तर मी दिलं असतं. माझा स्वभाव तुम्हांला माहिती आहे. तो बाळासाहेबांचाही होता. मागितलं तर मी काहीही देईल, पण हिकावलं तर त्याला त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. ही जिद्द आणि इर्षा केवळ आणि केवळ तुमच्या भरवशावर आहेत. तुम्ही सोबत आहात म्हणून मला कशाचीही चिंता नाही. मग हे भाजप असू दे किंवा हे गद्दार नामर्द असू दे, मला त्यांची परवा नाही आहे. काही काळ सत्ता उपभोगतील पण ज्यावेळी भाजपला कळेल ही यांची काडीचीही किंमत नाही. त्यांना हे कचऱ्याच्या टोपली टाकल्याशिवाय राहणार नाही. मग तो काळ खूप महत्त्वाचा आहे. या काळात मी आज परत परत एकच काम देतो आहे. नोंदणी-नोंदणी आणि नोंदणी... सदस्य नोंदणी समर्थनासाठी प्रतिज्ञापत्र तयार करणं. यापलिकडे तुम्ही एकडे तिकडे बघू नका. राजकारणात कोण काय बोलतं आहे. त्याकडे तुम्हांला लक्ष देण्याची गरज नाही. तुम्हांला जे काम दिलं आहे ते कृपा करून पुढचे आठ ते दहा दिवस कसं करता येईल, याकडे लक्ष द्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले,
अधिक वाचा : या अभिनेत्रीने ओटीटीवर बोल्ड सीन देत प्रेक्षकांच्या मनात लावली आग
जनतेच्या मनात आपल्या प्रति प्रेम आहे. जे काही घडलं त्यामुळे जनतेच्या मनात राग आणि चिड आहे. त्या रागाचा, भावनेचा आणि प्रेमाचा... जर आपण उपयोग हा शब्द मी वापरणार नाही. पण शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करू शकलो नाही तर आलेली संधी वाया जाईल. मातोश्रीवर भेटण्यासाठी लोंढेच्या लोंढे येत आहे. आता इकडे येऊ नका. आपण 50 लाखांचा आकडा पार केला. तर पुष्प गुच्छ न आणता सदस्य नोंदणीच्या गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन मला भेटायला या, ही आग्रहाची विनंती मी करतो आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात मी दौरा करणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.