Uddhav Thackeray has a dictionary of certain words says Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांच्याकडे ठरविक शब्दांची ‘डिक्शनरी’ (शब्दकोष) आहे. या डिक्शनरीतले शब्द ते फिरवून-फिरवून वापरत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते पुण्यात मीडिया प्रतिनिधींशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत हे रोज निर्बुद्धासारखे बोलत असतात, त्यांना काय उत्तर द्यायचे; असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले की, 12 आमदारांसंदर्भातील पत्र उद्धव ठाकरेंनी लिहिले होते, अजित पवारांनी नाही. राज्यपालांची मुलाखत मी संपूर्ण पाहिली नाही. पण, ते जे बोलले त्यातील बाबी सत्य आहेत. या पत्रानंतर काही नेते त्यांना भेटायला गेले, तेव्हा राज्यपालांनी त्यांना स्पष्टच सांगितले होते की, योग्य प्रारुपात पत्र पाठवा, अशा धमक्यांच्या पत्रावर मी निर्णय घेणार नाही. पण, मविआचा अहंकार आडवा आला आणि त्यांनी सांगितले की आम्ही ते पत्र बदलणार नाही.
भारतात उन्हाळी सुट्टीत फिरण्याची ठिकाणं
झोपेत घोरण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्यांसाठी प्रभावी घरगुती उपाय
पिंपल्सच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी खा हे पदार्थ
एमपीएससीसंदर्भात राज्य सरकारने तत्परतेने निर्णय घेऊन नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्यासंदर्भात एमपीएससीला विनंती केली होती. महाराष्ट्रात एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे, आम्ही त्यांना निर्देश देऊ शकत नाही, विनंती करु शकतो. त्यांनी आमचे पत्र सदस्यांपुढे ठेवले पण त्यांचे मत चालू वर्षीपासून पॅटर्न लागू करण्यासंदर्भात होते. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेरविनंती केली. त्यामुळे राज्य सरकारकडून सातत्याने पाठपुरावा केला जातो आहे. आमच्या विनंतीला ते मान देतील, अशी खात्री आहे. पण, तरी गरज पडलीच तर न्यायालयात जावे लागेल. कारण, विद्यार्थी हित सर्वोच्च आहे. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.