उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही, देश, महाराष्ट्र जेवढा ओळखत नाही, तेवढा मी ओळखतो: राज ठाकरे

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 23, 2022 | 22:26 IST

Raj Thackeray criticized to Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, देश किंवा महाराष्ट्र जेवढा त्यांना ओळखत नाही तेवढा मी त्यांना ओळखतो. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

uddhav thackeray is not a man to be trusted as much as people of country maharashtra do not know him i know him raj thackeray
उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही, देश, महाराष्ट्र जेवढा ओळखत नाही, तेवढा मी ओळखतो: राज ठाकरे 
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही, राज ठाकरेंची टीका
  • राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरे काय देणार उत्तर?
  • शिवसेनेत बाळासाहेबांचा विचार राहिलेला नाही, राज ठाकरेंनी साधला निशाणा

Raj Thackeray: मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जिव्हारी लागेल अशी अत्यंत बोचरी टीका केली आहे. 'उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही, देश, महाराष्ट्र जेवढा ओळखत नाही, तेवढा मी ओळखतो.' अशी थेट टीका राज ठाकरे यांनी केली आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीने घेतलेल्या विशेष मुलाखतीत ही टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर बरीच टीका केली आहे. (uddhav thackeray is not a man to be trusted as much as people of country maharashtra do not know him i know him raj thackeray criticism)

पाहा राज ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले:

'उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही'

२०१४ आणि २०१७ साली शिवसेना-मनसेच्या युतीची जोरदार चर्चा होती. याचविषयी मुलाखतीत जेव्हा राज ठाकरे यांना विचारला असता ते असं म्हणाले की, 'मी तुम्हाला सांगू का तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. विश्वास ठेवण्यासारखा नाहीए काही. त्या बाकी सगळ्या लोकांचं मला वाईट वाटतं. पण हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाहीए.'

अधिक वाचा: शिंदे गटाची मनसेशी नाळ घट्ट होण्याची शक्यता; राज ठाकरेंच्या भेटीला सरवणकर, चर्चेला उधाण

'तो भावनेचा आणि आजारपणाचा विषय आहे. ते ठीक आहे. पण मला माहितोय तो.. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही इतका जवळून तो मला माहिती आहे.' असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. 

'शिवसेनेत बाळासाहेबांचा विचारच राहिलेला नाही'
 
'मातोश्री ही एक वास्तू आहे आणि एक संघटना आहे. वास्तूवर काही प्रॉब्लेम नाहीए. ती तिकडेच आहे. विषय आहे संघटनेचा जो माणूस संस्थापक होता तो माणूस आता त्या संघटनेत नाहीए. ना त्याचा विचार त्या संघटनेत किंवा पक्षात आहे. हळहळ करण्यात काय अर्थ आहे? कारण शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार होता. आता बाळासाहेब हयात नाही.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

अधिक वाचा: Raj Thackeray: "वाटलं होतं तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल पण..." राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, वाचा जसंच्या तसं

'मराठी माणूस याबाबत समजून घेणं गरजेचं'

'मला नक्की वाटतं की, महाराष्ट्र, मराठी भाषा आपला धर्म, देश या गोष्टीकडे पुढच्या पिढीने गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. आपला माणूस, मराठी माणूस याबाबत समजून घेणं गरजेचं आहे. तो विचारांचा वारसा जपणं गरजेचं आहे.' अशा भावना राज ठाकरे यांनी आपल्या पुढील पिढीबाबत व्यक्त केल्या आहेत.

अधिक वाचा: मनसेच्या मते, उद्धव ठाकरेंबरोबर जे झालं ते चांगलचं झालं; सत्ता जाण्यावरून MNS नं स्पष्ट केली भूमिका

'जे तुम्ही पाहिलं नाहीत ते मी मुंबईत करुन दाखवेन' 

'मनसे सत्तेत आली तर एका वाक्यात सांगतो. जे तुम्ही पाहिलं नाहीत ते मी मुंबईत करुन दाखवेन. ती गोष्ट काय-काय असेल हे मी माझ्या जाहीरनाम्यात येईल.' असं म्हणत राज ठाकरेंनी या मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईच्या मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी