महाराष्ट्रात CBI ला संमतीशिवाय एन्ट्री नाही, राज्य विरुद्ध केंद्र वाद रंगण्याची शक्यता 

Maharashtra withdraws general consent to CBI: सीबीआयला महाराष्ट्रात परवानगीशिवाय तपास करता येणआर नाहीये कारण, महाराष्ट्र सरकारने सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी मागे घेतली आहे. 

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्र सरकारचा निर्णय 
  • सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी घेतली मागे 
  • यापुढे सीबीआयला महाराष्ट्रात तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवागी घ्यावी लागणार 

मुंबई : सीबीआय (CBI)ला तपासाच्या दिलेली सर्वसाधारण परवानगी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मागे घेतली आहे. या संदर्भातला निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. यामुळे आता सीबीआयाला महाराष्ट्रात कोणत्याही बाबतीत तपास करण्यापूर्वी राज्य सरकारची परवागनी घ्यावी लागणार आहे.

टीआरपी घोटाळ्याच्या संदर्भात एका जाहिरात कंपनीच्या प्रमोटरच्या तक्रारीवरुन उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उत्तरप्रदेश सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. त्यानंतर आता सीबीआय महाराष्ट्रातील मुंबई पोलिसांकडूनही टीआरपी घोटाळ्याचा तपास आपल्या हाती घेईल अशी चर्चा रंगली असताना आता राज्य सरकारने सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी मागे घेतली आहे.

मुंबई पोलिसांकडून टीआरपी घोटाळा उघड

८ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता. मुंबई पोलिसांनी दावा केला होता की, टीव्ही चॅनलचे टीआरपी वाढवण्यासाठी एक रॅकेट कार्यरत होते. तसेच ठराविक चॅनल्स घरात सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना पैसे दिल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनल्सच्या चालकांना अटक केली होती.

यापूर्वी कुठल्या राज्याने घेतलाय असा निर्णय

महाराष्ट्र सरकारने सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी मागे घेतली आहे. यापूर्वी राजस्थान आणि पश्चिम बंगाल या दोन राज्य सराकरने सुद्धा सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी मागे घेतली होती.

सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. यापूर्वी हा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र, सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि भाजपने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी