ठाकरे आणि फडणवीस यांचा 'सवाल जवाब'

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 07, 2022 | 16:23 IST

uddhav thackeray rally on 14th may and devendra fadnavis rally on 15th may 2022 : तमाशा या लोककलेत 'सवाल जवाब' रंगतात. आता राजकारणातही 'सवाल जवाब' रंगणार आहेत. राजकारणातला 'सवाल जवाब' महाराष्ट्रात होणार आहे.

uddhav thackeray rally on 14th may and devendra fadnavis rally on 15th may 2022
ठाकरे आणि फडणवीस यांचा 'सवाल जवाब'  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ठाकरे आणि फडणवीस यांचा 'सवाल जवाब'
  • उद्धव ठाकरे शनिवार १४ मे २०२२ रोजी जाहीर सभा घेणार
  • देवेंद्र फडणवीस रविवार १५ मे २०२२ रोजी मुंबईत जाहीर सभा घेणार

uddhav thackeray rally on 14th may and devendra fadnavis rally on 15th may 2022 : मुंबई : तमाशा या लोककलेत 'सवाल जवाब' रंगतात. आता राजकारणातही 'सवाल जवाब' रंगणार आहेत. राजकारणातला 'सवाल जवाब' महाराष्ट्रात होणार आहे. भाजपच्या 'पोलखोल सभा' आणि 'बूस्टर डोस सभा' याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शनिवार १४ मे २०२२ रोजी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस रविवार १५ मे २०२२ रोजी मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. या लागोपाठच्या सभांमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 'सवाल जवाब' रंगणार आहे.

पती रवि राणांना पाहताच नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला, पाहा Video

विधाननसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे सांगितले जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरे गप्प का होते असा प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला. हाच मुद्दा धरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. हिंदू विरोधी पक्षांच्या मांडीला मांडी लावून सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेचे हिंदुत्व संपल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. बाबरी ढाचा पाडला त्यावेळी तिथे शिवसेनेचा एकही नेता नव्हता; असेही फडणवीस म्हणाले. 

फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे १४ मे रोजी सभा घेणार आहेत. या सभेला उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस रविवार १५ मे २०२२ रोजी मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. लागोपाठच्या सभांमधून कोण काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी