Uddhav Thackeray । मुंबई : गेले अडीच वर्षा ठाकरे घराणे, घराण्याला मला, माझ्या कुटुंबियांवर अश्लाघ्य आणि विकृत भाषेमध्ये जी टीका करत होते. तेव्हा कोणाचीही दातखिळ उचकटली नाही. याच्यापैकी एकजणही त्याला विरोध होईल असे बोलला नव्हता, माझ्या मुलाला आयुष्यातून उठविण्यापर्यंत प्रयत्न केल्याची हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर केला आहे.
आज दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर आपले मत मांडले. यात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह, मोदी शहा भेटीला शिंदे जाणार, ठाकरे घराण्यावर टीका, यावर आपले रोखठोक मतं मांडली. मला दु:ख होत आहे. पण माशाचे अश्रू दिसत नाही असे एकदा बाळासाहेबांनी म्हटले होते. त्याचप्रमाणे माझी स्थिती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अधिक वाचा : रणवीर vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स शोमध्ये दिसणार रणवीर सिंग
बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करताना, उद्धव ठाकरे म्हणाले, जे इतके दिवस गप्प होते. ते तिकडे जाऊन बोलायला लागले आहेत. मातोश्रीने आम्हांला सन्मानाने बोलावले आणि भाजपशी चर्चा केली. तर आम्ही यायला तयार आहोत. मी याही पूर्वी प्रसार माध्यमांद्वारे आवाहन केले होते. तुम्ही सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा मला सुरत दाखवून मला इथेच बोलला असतात फेस टू फेस तर अधिक बरं झालं असतं. पर्यटन करण्याची काही गरज नव्हती. विशेष म्हणजे या लोकांना आजही मातोश्रीबद्दल प्रेम आहे. उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे. आदित्य ठाकरेंबद्दल प्रेम आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद देत आहेत.
अधिक वाचा : अल्लू अर्जुन आता 2 खलनायकांशी लढणार
पण दुसऱ्याच क्षणी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर हल्लाबोल कर म्हटले की, आजही तिकडे गेल्यानंतर तुम्हांला आमच्याबद्दल प्रेम वाटतं, तर खरंच धन्य झालो. पण हे प्रेम आता दाखवत आहात. तेच प्रेम गेले दोन अडीच वर्ष जी लोकं जो पक्ष याच घराला याच घराण्याला मला, माझ्या कुटुंबियांवर अश्लाघ्य आणि विकृत भाषेमध्ये जी टीका करत होते. तेव्हा कोणाचीही दातखिळ उचकटली नाही. याच्यापैकी एकजणही त्याला विरोध होईल असे बोलला नव्हता. मग ज्यांनी सर्व विकृत भाषा तसेच अडीअडचणी कशा निर्माण करता येतील. तसेच ठाकरे कुटुंबियांना आजपर्यंत कोणाची बोलण्याची हिम्मत नव्हती. अशा अत्यंत विकृत... कारण विकृत पेक्षा आणखी वाईट शब्द मला तरी आठवत नाही. पण ज्यांनी टीका केली. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आहात. त्यांच्या गाठीभेटी घेत आहात. त्यांना मिठ्या मारता आहात. मग तुमचे हे प्रेम खरं आहे की तकलादू आहे. कारण ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा अपमान केला. ठाकरे कुटुंबियाना अत्यंत हिणकस भाषेत टीका केली. माझ्या मुलांना आयुष्यातून उठविण्यापर्यंत प्रयत्न यांचे सुरू होते. अशा लोकांच्या सोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसत आहात. त्यांच्याकडून स्वागत स्वीकारत आहात. तर हे प्रेम खरं का खोटं हे जनतेला कळू द्या असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.