Uddhav Thackeray Interview : बंडखोरांचे शरद पवार यांच्यावर आरोप; उद्धव ठाकरे यांनी घेतली बाजू, म्हणाले

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. तसेच अनेक बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच शिवसेना संपवायला निघाली आहे असा आरोप केला होता. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची बाजू घेतली, तसेच आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिला अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray Interview : 
उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले
  • अनेक बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच शिवसेना संपवायला निघाली आहे असा आरोप केला होता.
  • यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची बाजू घेतली.

Uddhav Thackeray Interview : मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले. तसेच अनेक बंडखोर नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच (Congress NCP_) शिवसेना संपवायला निघाली आहे असा आरोप केला होता. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Shivsena Chief Uddhav Thackeray)  यांनी शरद पवार यांची बाजू घेतली, तसेच आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (Uddhav Thackeray says not congress ncp betrayed but my own party leader betrayed)

अधिक वाचा : Uddhav Thackeray Interview : एकनाथ शिंदे यांची हाव संपतच नाही, आता ते शिवसेना गिळायला निघालेत - उद्धव ठाकरे

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे जेव्हा भाजपसोबत युतीत होते तेव्हा ते तक्रार करायचे की भाजप आम्हाला त्रास देतोय. नंतर आपण भाजपसोबत युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकारचे स्थापन केले तर तेव्हा बंडखोरांनी तक्रार केली की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले त्रास देत आहेत. नेमकं एकनाथ शिंदे यांना हवं तरी काय ? एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची लालसा होती, ते त्यांनी अतिशय वाईट पद्धतीने मिळवलं. आणि आता शिवसेना प्रमुखांबरोबर तुलना करत आहेत की ही आमची शिवसेना आहे म्हणून. हे चित्र पाहता भाजप त्यांना विलीन करून घेणार नाही, कारण उद्या एकनाथ शिंदे स्वतःची तुलना नरेंद्र मोदींसोबत करतील आणि पंतप्रधानपद मागतील. ही सत्तेची चटक आहे. मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो परंतु मला सत्तेची कधी चटक नाही लागली. सत्तापिपासू तुम्ही एकदा झालात तर तुम्ही कुणाचेही होणार नाही आज तेच एकनाथ शिंदे यांचे झाले आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा : Chandrakant Patil:‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भाजपची खदखद आली समोर

शरद पवार दगा देण्यासाठीच प्रसिद्ध आहेत असा प्रचार भाजपने केला होता असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच काँग्रेस धोका देईल असे चित्रही उभे केले पण आपल्याच लोकांनी दगा दिला अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे म्हणाले की,  एकनाथ शिंदे यांनाही मी विचारलं होतं की भाजप सोबत जाऊया, मी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सांगितलं असतं की सरकार बरखास्त करूया. पण शिंदे काहीच बोलले नाही. माझी मुख्यमंत्रीपद स्विकाराण्याचीही तयारी नव्हती. मी मुख्यमंत्री इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो जिद्दीने मुख्यमंत्री झालो असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा : CM Eknath Shinde : भाजपसोबत युती झालेली पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सध्याचे सरकार हम तुम एक कमरेमे बंद हो

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. असे असले तरी राज्यात अजून सरकार स्थापन झालेले नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच सध्या हम तुम एक कमरे बंद हो असे असे सरकार सुरू आहे. और चाबी खो जाए. वरतून जेव्हा चावीने उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

अधिक वाचा :Suhas Kande: शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर प्रचंड खळबळजनक आरोप


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी