Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरे सूरतला गेले असते तर चित्र बदललं असतं का?  उद्धव ठाकरे म्हणाले...

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर ते सूरतला गेले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार सूरतला गेले आणि नॉट रिचेबल झाले होते. उद्धव ठाकरे सूरतला गेले असते आणि बंडखोर आमदारांसोबत संवाद साधला असता तर चित्र बदलले असते का? यावर उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपसोबत जाण्याचा काही आमदारांवर दबाव होता. तसेच ज्या मातोश्रीवर आणि ठाकरे कुटुंबीयांवर अतिशय अश्लाघ्य भाषेत टीका झाली तेव्हा हे बंडखोर आमदार गप्प का होते असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Uddhav Thackeray Interview
उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर ते सूरतला गेले होते.
  • उद्धव ठाकरे सूरतला गेले असते आणि बंडखोर आमदारांसोबत संवाद साधला असता तर चित्र बदलले असते का?
  • यावर उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपसोबत जाण्याचा काही आमदारांवर दबाव होता.

Uddhav Thackeray Interview : मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर ते सूरतला गेले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार सूरतला गेले आणि नॉट रिचेबल झाले होते. उद्धव ठाकरे सूरतला गेले असते आणि बंडखोर आमदारांसोबत संवाद साधला असता तर चित्र बदलले असते का? यावर उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपसोबत जाण्याचा काही आमदारांवर दबाव होता. तसेच ज्या मातोश्रीवर आणि ठाकरे कुटुंबीयांवर अतिशय अश्लाघ्य भाषेत टीका झाली तेव्हा हे बंडखोर आमदार गप्प का होते असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. (Uddhav Thackeray says pressure on shivsena mla for support bjp in maharashtra)

अधिक वाचा : Uddhav Thackeray Interview : एकनाथ शिंदे यांची हाव संपतच नाही, आता ते शिवसेना गिळायला निघालेत - उद्धव ठाकरे

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने २०१४ साली दगा दिला होता. ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तोडली.  ज्या भाजपने २०१९ साली ठरवलेल्या गोष्टी नाकारल्या त्याच भाजपसोबत जाण्यासाठी शिवसेनेचे काही आमदार जाण्यासाठी आग्रही आहेत. काही आमदारांवर भाजपसोबत जाण्याचा दबाव होता. त्यांना मी भेटून चर्चा करण्याचे आवाहनही केले होते असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच ज्या लोकांसोबत भाजप ९२-९३ साली हिंदुत्वासाठी लढले त्यांना त्रास देण्याचे काय कारण आहे हा माझा प्रश्न होता. २०१९ ला भाजपने ठरवलेल्या गोष्टी नाकारल्या त्यावर आता भाजप काय निर्णय घेणार आहे ? शिवसेनेला सन्मानाची वागणूक कशी देणार ? गेल्या अडीच वर्षात बाळासाहेबांच्या मातोश्रीवर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली, त्यावर बंडखोर आमदार आणि खासदारांची काय भूमिका आहे ? तुमच्या नेत्याबद्दल अशा प्रकारे टीका केल्यानंतरही कुठल्या तोंडाने त्यांच्यासोबत जाणार ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांना विचारला आहे. 

अधिक वाचा : Chandrakant Patil:‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भाजपची खदखद आली समोर

उद्धव ठाकरे म्हणाले की, छगन भुजबळांबाबत नेहमी सवाल उपस्थित केला जातो की त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर भुजबळांनी खुलासा केला आहे. तसेच भुजबळ मातोश्रीत येऊन त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेटही घेतली होती. त्यानंतर भुजबळांसोबतचे आपले वैर संपले असे बाळासाहेबांनी जाहीर केले होते असे उद्धव ठाकरे म्हणाले.  मी भाजपला हे ही सांगितले होते की शिवसेनेला तुम्ही पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले तर ज्या तारखेला राजीनामा द्यायचा आहे  ती तारीख आणि वार टाकून त्या मुख्यमंत्र्याची सही आणि पक्षप्रमुख म्हणून माझी सही केलेले या पत्राचे होर्डिंग करून मंत्रालयात लावा असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.  

Aaditya Thackeray: 'मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नाही' ठाकरेंची शिंदे गटासोबत चर्चेची तयारी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी