उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 19, 2019 | 17:35 IST

Shiv Sena MLA meeting: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांसोबत चर्चा करुन मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

uddhav thackeray shiv sena mla meeting 22nd november 2019 big decision bjp congress ncp maharashtra vidhan sabah election news
उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता  

थोडं पण कामाचं

  • उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक
  • बैठकीत सत्तास्थापनेबाबत होणार चर्चा
  • शुक्रवारी दुपारी १२ वाजता होणार बैठक 
  • बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांसोबत करणार राजकीय स्थितीवर चर्चा

मुंबई: राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या प्रमुखांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिलेला नाहीये. त्यातत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांसोबत चर्चा करुन निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी म्हणजेच २२ नोव्हेंबर रोजी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात आणि आमदारांना काय सूचना करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरुन निर्माण झालेल्या तिढ्यानंतर शिवसेनेने विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकत्र येऊन किमान समान कार्यक्रमाचा एक मसुदा तयार केला. हा मसुदा तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या अध्यक्षांना पाठवला आहे. या मसुद्यावर तिन्ही पक्षांचे अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील असंही सांगण्यात आलं. मात्र, असं असलं तरीही सत्तास्थापनेबाबत संभ्रामावस्था कायम असल्याचं दिसत आहे. 

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकारांना प्रतिक्रिया देत म्हटलं, राज्यात सत्तास्थापनेबाबत बहुमत असलेल्या भाजप आणि शिवसेनेला विचारा. त्यानंतर शरद पवारांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली मात्र, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कुठलीही चर्चा झालीच नाही असं शरद पवारांनी म्हटलं. या सर्वांमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी