Uddhav Thackeray Interview : सोडून गेलेले बंडखोर हे गद्दार नाहीत तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते या बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा करतात. पण सोडून गेलेले बंडखोर गद्दार नाही असे विधान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

uddhav thackeray interview
उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
  • त्यामुळे शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते या बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा करतात
  • पण सोडून गेलेले बंडखोर गद्दार नाही असे विधान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

Uddhav Thackeray Interview : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षातून बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government)कोसळले. त्यामुळे शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते या बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा करतात. पण सोडून गेलेले बंडखोर गद्दार नाही असे विधान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. (Uddhav Thackeray shivsena chief criticized cm eknath shinde in latest saamana interview with sanjay raut)

अधिक वाचा :  "... तर तुमचे लवंडे कसे वागले असते" Ashish Shelar यांचा Uddhav Thackeray यांच्यावर हल्लाबोल

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, बंडखोर आमदारांचा आक्षेप होता की मुख्यमंत्री झालो. खरंतर माझी मुख्यंत्री होण्याची इच्छा नव्हती. परंतु इच्छेने नव्हे तर जिद्दीने मी मुख्यमंत्री झालो. असे असले तरी या बंडखोरांचा काय आक्षेप आहे? मी मुख्यमंत्री झालो म्हणून बंडखोरांना काय अडचण आहे ? ज्या बाळासाहेबांच्या फोटोला हार घालत आहात त्याच बाळासाहेबांच्या पुत्राला तुम्ही गादीवरून खाली उतरवलंत. हेच एकनाथ शिंदे यांनी भाजपचा निषेध करण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्याचा व्हिडीओही आहे, आता तेच एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आणि त्यांनी मुख्यमंत्रिपद मिळवले असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा :  Shivsena : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, शिंदे गटावर केले आरोप

बंडखोर आमदार गद्दार नाहीत

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेना आमदारांनी बंड केले, तसेच शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे डझनभर खासदारही शिंदे गटात सामील झाले. ही बंडखोरी पाहून शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी या बंडखोर आमदार आणि खासदारांना गद्दार म्हणण्यास सुरूवात केली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही या बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला होता. तेव्हा बंडखोर नेत्यांनी आम्हाला गद्दार म्हणू नये अशी विनंती केली होती. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,  या बंडखोर नेत्यांना मी गद्दार  म्हटलेच नाही. हे लोक विश्वासघातकी आहेत, म्हणून मी त्यांचा उल्लेख विश्वासघातकीच असा केला असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

अधिक वाचा :  Uddhav Thackeray : कपाळावरचा विश्वासघाताचा शिक्का कसा पुसणार? उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना सवाल

लवकरच महाराष्ट्र दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे त्यांनी या मुलाखातीत सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की,मी ऑगस्टमध्ये बाहेर पडणार आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक पार पाडली त्यात मी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. सध्या शिवसेनेत जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मी जेव्हा राज्याच्या दौर्‍यावर निघेन तेव्हा माझ्यासोबत शिवसेनेचे नेते असतील. माझ्या राज्याच्या दौर्‍यामुळे सदस्य नोंदणी थांबेल. ही सदस्य नोंदणी झाल्यानंतरच मी राज्याचा दौरा सुरू करेन असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

अधिक वाचा : "विधानपरिषदेत एका पक्षाचे तीन आमदार फुटले, तीन मतांसाठी २१ कोटी" अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी