Uddhav Thackeray Speech : धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो; सनरुफ कारवरुन उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई
भरत जाधव
Updated Feb 18, 2023 | 16:19 IST

Uddhav Thackeray Speech :  शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह हातातून गेल्यानंतर आज ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्यांनी मातोश्री निवासस्थानी शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर सनरुफ कारवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

 uddhav thackeray slam narendra modi and eknath shinde
गद्दारांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. - उद्धव ठाकरे
  • निवडणूक आयोगाने ठाकरेंविरोधात निर्णय दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट
  • आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

मुंबई :  शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह हातातून गेल्यानंतर आज ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्यांनी मातोश्री निवासस्थानी शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर सनरुफ कारवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी डिवचलं. धनुष्यबाण (bow and arrow) पेलण्यासाठी मर्द लागतो, अशी  टीका ठाकरेंनी केली आहे. (uddhav thackeray slam narendra modi and eknath shinde on eci order)

अधिक वाचा  : डार्क चॉकलेट खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे
आज दुपारी 1 वाजता आमदार आणि खासदारांची बैठक देखील बोलावली होती. काही वेळ उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना देखील संबोधित केलं होतं. मात्र, शिवसैनिकांची वाढती गर्दी लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी कलानगर चौकात सनरुफ कारवरुन संवाद साधण्याचा निर्णय घेतला. 

अधिक वाचा  : बदलत्या हवामानात केस गळतात? मग करू नका या गोष्टी

काय म्हणाले उद्धव ठाकरे 

शिवसेना आणि धनुष्यबाण चोरलं गेलंय, पण त्यांना माहिती नाही त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलाय. गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसायचं नाही,असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधानांना असं वाटत असेल ज्या काही त्यांच्या गुलाम बनलेल्या यंत्रणा आहेत त्या अंगावर सोडून शिवसेना संपवता येत असेल तर असं होणार नाही. तुमच्या किती पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही. यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, पक्ष पाहिजे. शिवसेनेचं कुटुंब त्यांना नकोय. बाळासाहेबांचा मुखवटा घालून नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतंय ही आपली ताकद आहे.

अधिक वाचा  : पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा हे Indian superfoods
 
ज्या पद्धतीनं आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपलं धनुष्य बाण चोरांना दिला गेला. ज्या पद्धतीनं हे कपटानं राजकारण करतात त्या पद्धतीनं मशाल चिन्ह देखील घालवतील. पण, धनुष्यबाण चोरलंय त्यांना सांगतो तुमच्यापुढं मशाल चिन्ह घेऊन लढून दाखवतो. माझ्या हातात काही नाही पण एवढंच सांगतो. तरुण रक्त त्यांनी चेतवलेलं आहे. आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. 

अधिक वाचा  : कडू-कडू कारल्याचे आहेत गोड-गोड आरोग्यदायी फायदे

चोरांना गाडून छाताडावर उभा राहीन..

यावेळी उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, ‘धनुष्यबाण चोरणारे मर्द असतील..तर  तुम्ही धनुष्यबाण घेऊन या.. मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्हा आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभा राहील अशी टीका उद्धव ठाकरे केली. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

  • गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. चोरांना धडा शिकवणारच.
  • ज्यांनी शिवसेनेकडून नाव, धनुष्यबाण चोरलंय, त्यांनी माहिती नाही की, त्यांनी मधमाशीच्या पोळ्यावर हात मारलाय. या मधमाशीचा चावा काय असतो, हे लवकरच त्यांना कळेल.
  • सरकारी यंत्रणा भाजपच्या गुलाम झाल्या आहेत. निवडणूक आयुक्तही गुलाम झाले आहेत. गुलाम झालेल्या यंत्रणा अंगावर सोडून शिवसेना संपवणे शक्य होणार नाही.
  • निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यावर राज्यपाल होऊ शकतील. असे गुलाम भाजपने पाळलेत. मात्र, माझे या गुलामाला आव्हान आहे, ते शिवसेना कुणाची?, हे ठरवू शकत नाहीत.
  • गद्दारांना आज केवळ शिवसेना नाव हवय, बाळासाहेब ठाकरेंचं नाव हव आहे. पण, शिवसेनेच कुटुंब नकोय.
  • एक दिवस असा होता, जेव्हा मोदींचे मुखवटे घालून प्रचार केला जायचा. मात्र, आज मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून यावे लागत आहे.
  • आज महाराष्ट्रात मोदी चालत नाही. मोदींच्या नावावर आज महाराष्ट्रात मते मिळत नाहीत. हा महाराष्ट्राचा विजय आहे.
  • रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काय झालं? रावण उताणा पडला. आता ज्या चोरांनी शिवधनुष्य चोरलेय. तेदेखील उताणे पडल्याशिवाय राहणार नाही.
  • शिवसेनेविरोधात केवळ कटकारस्थाने चालू आहेत. उद्या आपले मशाल हे निवडणूक चिन्हदेखील ते गोठवू शकतात.
  • लढाई आता सुरू झालीये. ही चोरी आपण त्यांना पचू द्यायची नाहीये. तुम्ही शिवधनुष्य घेऊन या, मी मशाल घेऊन येईल. हिंमत असेल तर निवडणुकीत समोरासमोर या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच, शिवसैनिकांनो आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश दिले.
  • शिवसैनिकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, मी खचलेलो नाही. कारण शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. या गद्दारांच्या छाताडावर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे.
  • उद्या फेसबूक लाईव्ह घेऊन मी निवडणूक आयोगासमोर आपण काय-काय मांडले, निवडणूक आयोगाने कसा पक्षपाती निर्णय दिला, याची माहिती देणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी