उद्धव ठाकरे कडाडले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा ठाकरी शैलीत घेतला समाचार

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 24, 2022 | 17:52 IST

Uddhav Thackeray Press Conference: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. इतकेच नाही तर कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याच्या दाव्यावर भाष्य करत उद्धव ठाकरेंनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. 

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वेळ आली तर महाराष्ट्र बंदचं देखील पाहू - उद्धव ठाकरे
  • उद्धव ठाकरेंकडून राज्यपालांचा 'सॅम्पल' असा उल्लेख
  • 'सॅम्पल' ला दुसरीकडे कुठेही पाठवा, वृद्धाश्रमात पाठवा - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त विधान. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याच्या संदर्भात केलेला दावा या सर्व विषयांवरुन उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी खास ठाकरी शैलीत विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यापासून सातत्याने राज्याचे अवहेलना होत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असेल, राज्यातील उद्योग पळवणे असेल... सातत्याने अवहेलना होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या अंगात भूत संचारलेलं आहे. जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहतच नाहीत. महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभीमान, हिंमत, धमक काहीच नाहीये. कुणीही यावं टपली मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसायचं... हे आतापर्यंत खूप झालं. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यावर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या प्रतिक्रिया कोणाकडून दिल्या जात आहेत तर ज्यांनी त्यांचा अपमान केला आहे त्यांच्याच पक्षाच्या लोकांकडून दिल्या जात आहेत.

हे पण वाचा : काळ्या मिरीचे हे उपाय करतील तुम्हाला गडगंज श्रीमंत

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आपल्या देशाचे कायदेमंत्री यांनी देशाच्या न्यायालयीतील न्यायमूर्तींच्या नेमणुकीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. ती पद्धत अपारदर्शक आहे असे त्यांचे मत आहे आणि त्या नेमणुकीचे अधिकार पंतप्रधानांकडे असायला हवेत असे ते म्हणाले आहेत. दुसरं एक प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे त्यात निवडणूक आयुक्तांबाबत कोणी अपील केलीय त्याबाबत न्यायमूर्तींचे मत मागत आहोत. न्यायमूर्तींचे मत स्पष्ट आले आहे की, या देशाला शेष यांच्या सारखा निवडणूक आयुक्त पाहिजे. अगदी वेळ आलीच तर पंतप्रधानांवर कारवाई करण्याची वेळ आली तरी तो मागे हटता कामा नये.

हे पण वाचा : या फुटबॉल प्लेअर्सच्या गर्लफ्रेंडचा जलवा, फोटोजने लावली सोशल मीडियात आग

ज्यांचं सरकार केंद्रात आहे त्यांच्याच विचारसरणीची माणसे ही देशातील विविध राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवले जातात. या माणसांची पात्रता काय असते? जरासा एक शब्द वापरतो कोणी गैरसमज करू नये. वृद्धाश्रमात ज्यांना जागा नाही अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा सुद्धा प्रश्न केंद्र सरकारला विचारलं पाहिजे. राज्यपाल हे निपक्ष असायला हवेत. राज्यात पेच प्रसंग उभा राहीला तर राज्यपालांनी तो सोडवला पाहिजे. मात्र, ज्यांचं सरकार केंद्रात आहे त्यांच्याच विचारसरणीची माणसे ही राज्यपाल म्हणून पाठवल्यावर राज्यपाल जे काही बोलतात ते गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कोणीही व्यक्ती राज्यपाल आहे म्हणून त्याने काही वेडेवाकडे काही बोलावं आणि महाराष्ट्र मान्य करेल असे मला वाटत नाही. 

हे पण वाचा : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल या गोष्टींची घ्या काळजी

काही दिवसांपूर्वी कोश्यारींनी मराठी माणसाचा अपमान केला होता. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं. शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, ते आमचे दैवत आहेत. जी काही शक्कल आहे ती राज्यपालांच्या काळ्या टोपीच्या मागून आलेली नाहीये त्याच्या मागे कोण आहे हे सुद्धा शोधण्याची वेळ आली आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी