परबांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिल्यानं कदम ठरले सेनेचे दुश्मन; पुन्हा आमदारकीची संधी देण्यास शिवसेना नेतृत्व नाखुश

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 19, 2021 | 19:34 IST

शिवसेनेचे धडाडीचे नेते म्हणून ओळख असलेले रामदास कदम आता सेनेला दुश्मन वाटू लागले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांना माहिती पुरवल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे.

Uddhav Thackeray  unhappy for Ramdas kadam to be given another chance to become MLA
रामदास कदमांना पुढच्या वेळेस आमदार झाल्यासारखं वाटणार नाही?  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या उमेदवाराची निवड केली जाणार
  • कदमांवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांना माहिती पुरवल्याच्या आरोप.
  • फडणवीस सरकारच्या काळात कदमांनी पर्यावरण मंत्रिपद भूषवलं आहे.

मुंबई: शिवसेनेचे धडाडीचे नेते म्हणून ओळख असलेले रामदास कदम आता सेनेला दुश्मन वाटू लागले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांना माहिती पुरवल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपानंतर रामदास कदम (Ramdas Kadam) यांना आणखी एक धक्का देण्याचं शिवसेना नेतृत्वानं ठरवल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळालेल्या कदम यांना पुन्हा आमदारकीची संधी दिली जाणार नसल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. 

रामदास कदम हे सध्या विधान परिषदेत शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यांची मुदत पुढील वर्षीच्या पहिल्याच महिन्यात संपणार आहे. मात्र त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कदमांऐवजी नव्या चेहऱ्याला विधान परिषदेत आणले जाणार आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

रामदास कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. मंत्रिपद भूषवलं आहे. त्याशिवाय ते विरोधी पक्ष नेतेही राहिले आहेत. शिवसेनेतील एक आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, मंत्रिपदावरून बाजूला केल्यापासून ते नाराज असल्याचे बोलले जात होते. त्याच नाराजीतून त्यांनी अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना माहिती पुरवल्याचा आरोप आहे. मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी तसा जाहीर आरोप केला होता. त्यानंतर रामदास कदम व आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या.

त्यामुळे कदम यांच्यावरील संशय बळावला होता. या संपूर्ण घटनाक्रमामुळे उद्धव ठाकरे कमालीचे नाराज आहेत. त्यांची नाराजी आणि शिवसैनिकांचा रोष टाळण्यासाठी रामदास कदम हे यंदाच्या दसरा मेळाव्यालाही गेले नाहीत. आता आमदारकी नाकारून त्यांच्यासह पक्षातील अनेकांना योग्य तो संदेश देण्याचे पक्ष नेतृत्वाने ठरवल्याचे सांगितले जात आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी