Narayan Rane: 'उद्धव ठाकरे जगातला 'ढ' माणूस, आता संजय राऊतच्यासोबत हा पण जेलमध्ये जाणार,' राणेंची जहरी टीका

मुंबई
रोहित गोळे
Updated Sep 22, 2022 | 18:33 IST

Narayan Rane Criticized Uddhav Thackeray: भाजप नेते नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड घणाघाती अशी टीका केली आहे. पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले.

uddhav thackeray will now go to jail along with sanjay raut narayan rane venomous criticism
'उद्धव ठाकरे जगातला 'ढ' माणूस', राणेंची जहरी टीका 
थोडं पण कामाचं
  • नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
  • नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली वादग्रस्त टीका
  • मोदी-शाहांवर टीका न करण्याचा दिला राणेंनी इशारा

Narayan Rane BJP: मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राजधानी दिल्लीत (Delhi) आज (22 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अत्यंत जहरी अशी टीका केली. 'उद्धव ठाकरे हा जगातील ढ व्यक्ती असून आता तो देखील संजय राऊतप्रमाणे तुरुंगात जाईल.' अशी एकेरी भाषेतील टीका नारायण राणेंनी केली आहे. (uddhav thackeray will now go to jail along with sanjay raut narayan rane venomous criticism)

उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात भाजपवर तुफान टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आज तात्काळ पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र यावेळी नारायण राणेंनी संपूर्ण पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचा एकेरीच उल्लेख केला.

अधिक वाचा: शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाची न्यायालयात धाव

पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले:

'पिंजऱ्यात असलेल्या संजय राऊतची खुर्ची ठेवतो तू...'

'हे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. मातोश्रीनी सगळा मेवा खोक्यांच्या रुपात खाल्ले आहेत. हे यशवंत जाधव, एकनाथ शिंदे सांगत आहेत. अरे औकात आहे का तुझी? पिंजऱ्यात असताना तो संजय राऊत त्याची खुर्ची ठेवतो तू.' 

अधिक वाचा: 'तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला', फडणवीसांचा आरोप

'उद्या तू पण आत जाशील... संजयचा सोबती म्हणून'  

'कोणाला गिधाडं म्हणतोस तू.. देशाचे मोठे नेते देश सांभाळत असताना जनाची नाही पण मनाची तरी काही लाज वाटत नाही का? याला तर मी उपमा देईल लबाड लांडगा. याच्या एवढा खोटारडा माणूस मी पाहिला नाही. किती खोटं बोलतो. युती असताना काल-परवापर्यंत अमित शाहांना फोन करत होता. मला भाजपमध्ये घेऊ नये यासाठी शेवटपर्यंत अमित शाह यांना फोन करत होता.' 

'काय इतिहास..  आदिलशहा, अफजलखान अमूक-तमुक.. आणि हे शाह.. अरे काय वाटत नाही? हे सगळं क्राईम आहे रे..  ही सगळी टीका आहे ना.. उद्या आत जाशील. संजयचा सोबती म्हणून. जे काही बोललाय ना.. गिधाडं वैगरे.. कोणाला उद्देशून आहे रे.. आत जाशील. आतचा रस्ता आहे. खोक्यांचा विषय आहेच. काय सुटला नाहीएस तू. की, सुशांतमधूनही तुझा मुलगा सुटला नाहीए. ते आहेच.. आतमध्ये गेला तर बाहेर येणार नाही.' अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

अधिक वाचा: देशभरात ED आणि NIAचे छापे, महाराष्ट्रातून 20 जण ताब्यात

'हा जगातला 'ढ' माणूस आहे'

'370 कलम रद्द करणारे आमचे अमित शाह हे संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना असं गिधाड वैगरे म्हणताना लाज वाटत नाही? भाजपचा हात धरुन, मोदींच्या नावे प्रचार करुन खासदार, आमदार निवडून आणले. या उद्धव ठाकरेची दहा आमदार आणि पाच खासदार निवडून आणण्याची ताकद नाही. काय बोलतो...' 

'मुंबई महानगरापालिका धुतली यांनी, मुंबईकरांचं शोषण केलं याने. एवढ्या वर्ष महानगरपालिका यांच्याकडे. पण यांनी मुंबई बकाल केली. बेस्टमध्ये वेळेत पगार नाही, महानगरापालिकेत पगार नाही. डबघाईला आणल्या दोन्ही संस्था. काही येत नाही याला. हा जगातला 'ढ' माणूस आहे. एवढा 'ढ' माणूस मी पाहिला नाही. दोन वाक्य सांगितली की, उद्धवजी हे बोला हा.. पण हा बोलतो काही तरी भलतंच.सगळी दुसऱ्याकडून कामं करुन घेतली याने. त्यामुळे मोदी वैगरेंवर बोलू नको. तुला जड जाईल, तू नखाएवढा पण नाही.' अशी वादग्रस्त टीका नारायण राणे यांनी केली आहे.  

अधिक वाचा: लग्नाला नकार दिला म्हणून महिलेच्या पोटात खुपसला चाकू

'काय तर म्हणे कोथळा काढणार.. तू काढणार का कोथळा? आमच्यासारखे लोक हे अजून जिवंत आहेत भाजपमध्ये. वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना तर जागेवर डोळे ठेवणार नाही आम्ही. या पुढे वाकड्या नजरेनं पाहिलं आणि कोणालाही भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या कोणत्या व्यक्तीच्या केसाला जराही धक्का लागला ना तर तू महाराष्ट्रात फिरुनच दाखव.' असं आव्हानच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी