100 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मातोश्रीवरून फोन, संजय राऊतांच्या डोळ्यात आश्रू अन् चेहऱ्यावर हसू , VIDEO

Sanjay Raut : मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येताच कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने उभे असलेल्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले.

Uddhav Thackeray's call to Sanjay Raut as soon as he came out of jail
100 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मातोश्रीवरून फोन, संजय राऊतांच्या डोळ्यात आश्रू अन् चेहऱ्यावर हसू , VIDEO ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला
  • तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत
  • जेलमधून बाहेर पडताच 'मातोश्री'वरून फोन

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर 100 दिवसांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. संजय राऊत यांनीही हात हलवून तुरुंगाबाहेर आले. शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि ढोल वाजवून आनंद साजरा केला. (Uddhav Thackeray's call to Sanjay Raut as soon as he came out of jail)

अधिक वाचा : Sanjay Raut: ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ पुन्हा धडाडणार, संजय राऊतांना जामीन

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. सायंकाळी उशिरा संजय राऊत 100 दिवसानंतर अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत.यावेळी जेल बाहेर येताच त्यांच्या गळ्यात भगवं उपरणं, तोच उत्साह तोच जोश पाहायला मिळाला.

जेलमधून बाहेर पडल्यानंतर ते भाऊ आमदार सुनिल राऊत यांच्या कारमध्ये तेव्हा त्यांच्या फोनवरुन 'मातोश्री'शी संवाद साधला. यावेळी त्यांच्या उध्दव ठाकरे बोलत होते. तेव्हा संजय राऊत यांच्या डोळे पाणवले होते. तसेच चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले. त्यानंतर पूर्वीच्याच जोशात संजय राऊतांनी समर्थकांना अभिवादन केले आणि ते घराच्या दिशेने रवाना झाले.

अधिक वाचा : संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यावर रोहित पवारांकडून 'वाघा'चा जबरदस्त व्हिडिओ ट्विट 

यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “जामिनाच्या निकालानंतर माझा न्यायालयावरचा विश्वास वाढला. न्यायव्यवस्था, घटना, कायदा जीवंत आहे”, तसेच “उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर काय बोलणं झाले. तेही माझा आवाज ऐकण्याची वाट पाहत होते. त्यांचाही घसा भरुन आला होता”, असे राऊत यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी