Uddhav Thackeray: 'राज्यपालांच्या बेताल विधानाचा समाचार घेणार', उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Bhagat singh koshyari controversial statement: राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

uddhav thackerays press conference at 1 pm on governor bhagat singh koshyari controversial statement
'राज्यपालांच्या बेताल विधानाचा समाचार घेणार'  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य
  • राज्यपाल कोश्यारींच्या वक्तवाचा समाचार घेण्यासाठी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
  • संजय राऊत यांची देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य

Bhagat Singh Koshyari: मुंबई: गुजराती (Gujarati) आणि राजस्थानी लोकांमुळेच मुंबई (Mumbai) आर्थिक राजधानी आहे. त्यांना जर काढून टाकलं तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही. असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता राजकारण तापलं असून सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. त्यातच या प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज (३० जुलै) पत्रकार परिषद घेणार आहेत. (uddhav thackerays press conference at 1 pm on governor bhagat singh koshyari controversial statement)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याबाबत ट्विट केलं आहे. पाहा संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे. 

अधिक वाचा: 'मुख्यमंत्री शिंदे दिल्ली पुढे किती झुकताय?'

'राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद: आज. मातोश्री.१ वाजता.' अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. यासोबतच संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचं पोस्टर देखील शेअर केलं आहे.

राज्यपाल कोश्यारी-ठाकरेंमध्ये सातत्याने खटके

दरम्यान, राज्यात जेव्हा ठाकरे सरकार अस्तित्वात आलं होतं. तेव्हापासूनच राज्यापाल कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्यात सातत्याने खटके उडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. अनेकदा राज्यपालांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांची शासकीय कामकाजात देखील अडवणूक केली असल्याची टीका शिवसेनेने अनेकदा केली होती. असं असताना आता जेव्हा राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्यावर घणाघात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे राज्यपाल कोश्यारींवर जोरदार हल्ला चढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा: गुजराती आणि राजस्थानींमुळे मुंबई आर्थिक राजधानी - कोश्यारी

संजय राऊतांचाही हल्लाबोल 

दरम्यान, याच प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील राज्यपालांवर हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विटरवर अनेक ट्विट करुन राज्यपालांवर टीका केली. तसेच माध्यमांशी बोलताना देखील राज्यपाल आणि भाजपवर निशाणा साधला.

'महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका.. मुख्यमंत्री शिंदे.. राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे..' असं ट्विट करत संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी