Shiv Sena BJP yuti: ठाकरेंनी केली हातमिळवणीची तयारी पण १२ आमदार आणि राणेंमुळे झाली बिघाडी, वाचा नेमकं काय घडलं?

Deepak Kesarkar: शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर कशाप्रकारे राणेंकडून आरोप करण्यात आले यावर केसरकर यांनी पत्रकार भाष्य केलं आहे. तसेच शिवसेना-भाजप युतीच्या संदर्भातही गौप्यस्फोट केला आहे.

Uddhav Thackerya was ready for yuti with bjp but narayan rane and bjp 12 mla suspension cause break the discussion
Shiv Sena BJP yuti: ठाकरेंनी केली हातमिळवणीची तयारी पण १२ आमदार आणि राणेंमुळे झाली बिघाडी, वाचा नेमकं काय घडलं? (File Photo)  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य यांची बदनामी करण्याचा प्रयत्न - दीपक केसरकर 
  • आदित्य यांच्या बदनामी करण्यात राणेंचा मोठा वाटा - दीपक केसरकर
  • आदित्य यांच्या बदनामीनं दुखावल्यानं भाजपला जाब विचारला होता - दीपक केसरकर

Shiv Sena BJP Alliance news updates: शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी शिवसेना-भाजप युतीच्या संदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जुळवून घेण्यासाठी तयारी दर्शवली होती मात्र, दरम्यानच्या काळात अशा काही गोष्टी घडल्या की त्यामुळे प्रकरण बिघडलं. (Uddhav Thackeray was ready for yuti with bjp but narayan rane and bjp 12 mla suspension cause break the discussion)

नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर? 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ही वस्तूस्थिती आहे की, ज्यावेळी सुशांतसिंह राजपूत प्रकरण घडलं त्यावेळी आदित्य यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बदनामी करण्यात सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या पत्रकार परिषदा घेतला त्यात त्यांचा मोठा वाटा होता. आदित्य ठाकरेंच्या बदनामीत राणेंचा मोठा वाटा होता. आमच्या सारखे लोकं जे ठाकरे कुटुंबीयांवर प्रेम करतात ती सुद्धा यापासून दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक जेष्ठ नेत्यांचे माझे संबंध आहेत. मी त्यांना विचारलं होतं की, तुमचा प्लॅटफॉर्म असा कसा वापरू देता. तेव्हा त्यांनी सांगितलं की, आमच्या बऱ्याच आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे.

अधिक वाचा : मोठी बातमी.. 'या' दिवशी होणार शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

आपल्या घरातील किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची बदनामी होते तेव्हा किती वेदना होतात हे मी समजू शकतो. त्यामुळे मला कुणालाही सांगितलं नव्हतं तरी मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि वस्तूस्थिती सांगितली. मी सांगितलेली माहिती त्यांनी ऐकली आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवस्थित रिस्पॉन्ड केला असंही दीपक केसरकर म्हणाले.

अधिक वाचा : प्रभाग रचनांच्या संदर्भात राज्य सरकारचा निर्णय; शिंदेंचा नवा धक्का, मविआला बसला मोठा झटका

सुशांतसिंह प्रकरणात नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे याच्यात चर्चा सुरू झाली. याच दरम्यान ज्या ज्यावेळेला महत्त्वाचे मुद्दे होते त्यावेळी योग्य ती माहिती आम्ही त्यांना पुरवली. त्यानंतर पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेटही झाली होती. कुटुंबप्रमुख कसा असावा हे पंतप्रधानांनी त्याठिकाणी दाखवून दिलं. त्यांच्या बोलण्यातून आणि निरोपातून बाळासाहेब ठाकरेंबाबतचा आदर आणि ठाकरे कुटुंबाबाबत असलेलं प्रेम वारंवार समोर येत होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या संदर्भातील माहिती उद्धव ठाकरेंकडून कळाली. त्यावर त्यांनी म्हटलं होतं, मला माझ्या पदापेक्षा तुमच्यासोबत असलेले कौटुंबिक संबंध जपण्याला मी जास्त महत्त्व देतो. म्हणून त्याच वेळेला उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा त्याग करण्याचं ठरवलं होतं. पुढील १५ दिवसांत ते आपल्या पदाचा त्याग करणार होते. काहीही खोटं बोलून मला कुणाची बदनामी करण्याची गरज नाही. दरम्यानच्या काळात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झालं. हे निलंबन ज्यावेळी झालं त्यावेळी भाजपकडून निरोप आला की, आपलं बोलणं सुरू असताना असं निलंबन आणि इतक्या काळासाठी करणं हे योग्य नाही. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंचा समावेश झाला. ही गोष्ट उद्धव ठाकरेंना आवडली नाही आणि पुढील चर्चा थाबंली असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी