दाऊद इब्राहिम दर महिन्याला भावंडांना पाठवतो १० लाख रुपये, असे साक्षीदाराने  ईडीला सांगितले

१९९३ च्या बॉम्बे साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातील कराची येथे वास्तव्यास होता, या दाव्यानंतर हा खुलासा झाला.

underworld don dawood ibrahim sends rs 10 lakh to siblings every month ed told by witness read full in marathi
दाऊद इब्राहिम दर महिन्याला भावंडांना १० लाख रुपये पाठवतो 
थोडं पण कामाचं
  • फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात आपल्या भावंडांना दरमहा १० लाख रुपये पाठवतो.
  • खालिद उस्मान शेख याने ईडीला सांगितले की, फरारी डॉनचा धाकटा भाऊ इक्बाल कासकर याच्याकडून आपल्याला या पैशांच्या हस्तांतरणाची माहिती मिळाली.
  • “कासकरने मला सांगितले की दाऊद त्याच्या माणसांमार्फत पैसे पाठवतो. त्यालाही दरमहा 10 लाख रुपये मिळतील, असे त्याने सांगितले.

मुंबई: नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणातील एका साक्षीदाराने अंमलबजावणी संचालनालयाला सांगितले आहे की, फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात आपल्या भावंडांना दरमहा १० लाख रुपये पाठवतो. खालिद उस्मान शेख याने ईडीला सांगितले की, फरारी डॉनचा धाकटा भाऊ इक्बाल कासकर याच्याकडून आपल्याला या पैशांच्या हस्तांतरणाची माहिती मिळाली. (underworld don dawood ibrahim sends rs 10 lakh to siblings every month ed told by witness read full in marathi )

“कासकरने मला सांगितले की दाऊद त्याच्या माणसांमार्फत पैसे पाठवतो. त्यालाही दरमहा 10 लाख रुपये मिळतील, असे त्याने सांगितले. काही प्रसंगी, त्याने मला रोख रक्कम दाखवली आणि दाऊद भाईकडून पैसे मिळाल्याचे सांगितले,” खालिदने ईडीला सांगितल्याचे वृत्त  टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. 

दाऊद खरंच पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा झाला. दाऊदची दिवंगत धाकटी बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीला सांगितले की ते दाऊदशी कोणतेही संबंध ठेवत नाहीत, परंतु डॉनची पत्नी मेहजबीन सणासुदीला त्याच्या पत्नी आणि बहिणींशी बोलते.

"मला सूत्रांकडून आणि कुटुंबातील सदस्यांकडून कळले की दाऊद कराचीत आहे... अधूनमधून जसे की ईद, दिवाळी आणि इतर सणासुदीच्या प्रसंगी मेहजबीन... माझी पत्नी आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असते," अलीशाहने ईडीला सांगितले.

ईडीसमोर हजर असताना अलीशाहने केंद्रीय एजन्सीला सांगितले होते की, त्याची आई हसीना गृहिणी असली तरी ती उदरनिर्वाहासाठी काही आर्थिक व्यवहार करत असे.
"तिच्या मालकीच्या मालमत्तेतून तिला भाडे मिळायचे. ज्या लोकांना त्यांच्या व्यवसायासाठी निधीची गरज आहे, अशा लोकांना ती 3 ते 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम उधार देत असे. त्यासाठी तिला एखाद्या प्रकरणात नफा मिळत असे," असेही अलीशाहने सांगितले. 

त्याची आईही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असे, असेही अलीशाहने सांगितले. "दाऊद इब्राहिमची बहीण असल्याने, माझी आई आमच्या समाजातील एक ओळखीची व्यक्ती होती; ती मालमत्तेशी संबंधित वाद मिटवत असे," त्याने दावा केला.

दरम्यान, मंगळवारी रात्री ईडीने दाऊदच्या अनेक साथीदारांची चौकशी केल्याचे वृत्त आहे आणि चौकशीदरम्यान छोटा शकीलचा नातेवाईक सलीम याने गुंड पाकिस्तानातील कराचीमध्ये असल्याचे उघड केले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी