केंद्रीयमंत्री नारायण राणेंवर लिलावतीमध्ये अँजिओप्लास्टी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 27, 2022 | 16:09 IST

Union Minister Narayan Rane undergoes angioplasty at Lilavati Hospital Mumbai : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना छातीत वेदना होऊ लागल्यामुळे मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी नारायण राणे यांची अँजिओप्लास्टी केली. आता नारायण राणे यांची तब्येत स्थिर आहे.

Union Minister Narayan Rane undergoes angioplasty at Lilavati Hospital Mumbai
केंद्रीयमंत्री नारायण राणेंवर लिलावतीमध्ये अँजिओप्लास्टी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • केंद्रीयमंत्री नारायण राणेंवर लिलावतीमध्ये अँजिओप्लास्टी
  • नारायण राणे यांची तब्येत स्थिर
  • वैद्यकीय पथक नारायण राणेंच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे

Union Minister Narayan Rane undergoes angioplasty at Lilavati Hospital Mumbai : मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना छातीत वेदना होऊ लागल्यामुळे मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी नारायण राणे यांची अँजिओप्लास्टी केली. आता नारायण राणे यांची तब्येत स्थिर आहे. वैद्यकीय पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. 

नारायण राणे हे केंद्रीयमंत्री तसेच भाजपचे कोकणातील एक प्रभावी नेते आहेत. महाराष्ट्रात लवकरच राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यानंतर विधान परिषदेसाठीही निवडणूक होणार आहे. यामुळे राज्यातले राजकीय वातावरण ढवळून निघत असताना राणेंची तब्येत बिघडल्याचे वृत्त आले. यामुळे अनेकांचे लक्ष सकाळपासूनच नारायण राणे यांच्या तब्येतीविषयीच्या वृत्ताकडे होते. अखेर डॉक्टरांनी नारायण राणेंवर अँजिओप्लास्टी केल्याचे तसेच राणेंची तब्येत अँजिओप्लास्टीनंतर स्थिर असल्याचे सांगितले.

दोन-चार दिवस हॉस्पिटलमध्येच नारायण राणे विश्रांती घेणार आहेत. तब्येतीत अपेक्षित सुधारणा दिसून आल्यावर त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले. नारायण राणे यांची प्रकृती स्थिर आहे आणि चिंतेचे कारण नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली. राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पुढे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात वाद झाले. नंतर राणेंनी आधी काँग्रेस नंतर स्वतःचा स्वाभिमानी पक्ष आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे भाजपकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले आहेत. सध्या ते केंद्रीयमंत्री आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी