Maharashtra: कार्यकर्ते वाढविण्याचा अनोखा प्रयोग, काँग्रेसमध्ये या अन् मोफत अर्धा लिटर दूध मिळवा

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 31, 2022 | 09:24 IST

देशभरात भाजपचा (BJP) दबदबा वाढत आहे, यामुळे विरोधी पक्षातील (opposition) नेते कार्यकर्ते (Party Worker) स्वत:चा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये उड्या मारत आहेत. पक्ष कार्यकर्ते नसल्यानं पक्षाची ताकद कमी होऊ लागलीय.

join Congress and get free half a liter milk
मोफत अर्धा लिटर हवंय मग देशाच्या जुन्या पक्षाकडे जा..   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जो व्यक्ती पक्षात येईल त्याला अर्धा लिटर दूध मोफत
  • काँग्रेसची पक्षात या अन् मोफत दूध घ्या ही सभासदत्वाची कल्पना झाली लोकप्रिय
  • वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आज देशभरात निदर्शने करणार

मुंबई: देशभरात भाजपचा (BJP) दबदबा वाढत आहे, यामुळे विरोधी पक्षातील (opposition) नेते कार्यकर्ते (Party Worker) स्वत:चा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये उड्या मारत आहेत. पक्ष कार्यकर्ते नसल्यानं पक्षाची ताकद कमी होऊ लागलीय. पाच राज्यात झालेल्या पराभवामुळे काँग्रेस (Congress) हायकमांडने कार्यकर्ते वाढविण्याचे आदेश प्रत्येक राज्यातील काँग्रेस पक्षाला दिले आहेत. परंतु महाराष्ट्रात आधीच अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या काँग्रेसला कार्यकर्ता प्रवेश मोहिम अधिकच दबावाची वाटत आहे. यासाठी खास अनोखा प्रयोग केला. जो व्यक्ती पक्षात येईल त्याला अर्धा लिटर दूध मोफत असा उपक्रम काँग्रेसने आखला. 

काँग्रेसची ही ऑफर ऐकताच मुंबईतील लोकांच्या दूध घेण्यासाठी  लांबच लांब लागल्या होत्या. अनेकजण आपलं मतदान कार्ड घेऊ मोफत दूध घेण्यासाठी आले होते. परंतु अनेकजण दूध मिळणार म्हणूनच रांगेत उभे होते, काँग्रेस पक्ष त्यांचे मतदार कार्ड वापरून सदस्यत्व फॉर्म भरत आहे हे त्यांना माहीत सुद्धा नव्हते. येथे आलेल्या महिला म्हणल्या की, आम्हाला फक्त ओळखपत्र आणा आणि दूध घेऊन जा असं सांगण्यात आलं. खरे तर पाच राज्यांतील दारूण पराभवानंतर सर्व राज्यांच्या काँग्रेस कमिटीवर सदस्यसंख्या वाढवण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून मोठा दबाव आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला जरा जास्तच दडपण जाणवत आहे.

Read Also : दहा दिवसात 9 वेळा वाढल्या पेट्रोल-डिझेलचा दर

सातत्याने वाढत आहेत किमती 

खरं तर, यावेळी देशात तेलापासून ते खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. काही काळापूर्वी दुधाचे दर वाढल्यानंतर राज्यात अमूलच्या दुधाचा दर एक लिटरसाठी ६० रुपये आहे. याशिवाय पेट्रोल-डिझेल-गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे जनतेचे बजेट बिघडले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसची पक्षात या अन् मोफत दूध घ्या ही सभासदत्वाची कल्पना गाजली आहे. दूध घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Read Also : आश्रम फेम त्रिधा चौधरीने मोनोकीनीमधले फोटो केले पोस्ट

आज काँग्रेसची निर्दशने 

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आज देशभरात निदर्शने करणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करणार आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर महिला काँग्रेस आंदोलन करेल, त्यानंतर काँग्रेसचे सर्व खासदार सकाळी 9.30 वाजता विजय चौकात महागाईविरोधात आंदोलन करतील. काँग्रेस खासदार राहुल गांधीही या आंदोलनात सहभागी होऊ शकतात. विजय चौकातील काँग्रेसच्या निदर्शनाचे नेतृत्व राहुल गांधी करणार आहेत तर पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या शिमल्यातील आंदोलनात सहभागी होतील अशी शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी