University Exam 2022: सर्वचं प्रश्नांची उत्तरे लिहिता येणार; विद्यापीठाच्या ऑफलाईन परीक्षांसाठी मिळणार जास्त वेळ

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 14, 2022 | 11:20 IST

कोरोना महामारीमुळे (Corona epidemic) मागील दोन वर्षी सर्व परीक्षा या ऑनलाईन (Online Exam) पद्धतीने घेण्यात आल्या. पण आता हळूहळू सर्वकाही सुरळीत झाले असून शैक्षणिक संस्था (Educational Institution) सुरू झाल्या आहेत, त्यामुळे यावर्षी परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत.

More time for offline university exams
विद्यापीठाच्या ऑफलाईन परीक्षांसाठी मिळणार जास्त वेळ   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटल्याने पेपर देण्यास वाढीव वेळ मिळणार
  • मे महिन्यात अनेक विद्यापीठाच्या परीक्षा होणार आहेत.

University Exam 2022: मुंबई :  कोरोना महामारीमुळे (Corona epidemic) मागील दोन वर्षी सर्व परीक्षा या ऑनलाईन (Online Exam) पद्धतीने घेण्यात आल्या. पण आता हळूहळू सर्वकाही सुरळीत झाले असून शैक्षणिक संस्था (Educational Institution) सुरू झाल्या आहेत, त्यामुळे यावर्षी परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. मे महिन्यात राज्यातील विविध विद्यापीठांच्या (Universities) ऑफलाईन परीक्षा होणार आहेत. 
दरम्यान परीक्षा म्हटलं म्हणजे सर्वांना टेन्शन येत असतं. परंतु आता परीक्षाविषयी हाती आलेली बातमी ऐकून अनेकांचे चेहऱ्यांवर हसू येईल.  कारण विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रतितास 15 मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात येणार आहे. वाढीव वेळामुळे विद्यार्थ्यांची उत्तरे लिहिताना घाई होणार नसून विद्यार्थी आरामात सर्व प्रश्न सोडवू शकणार आहेत. 

बुधवारी परीक्षासंदर्भात कुलगुरुंची बैठक झाली. या बैठकीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षा देताना प्रतितास 15 मिनिटे अधिकचा वेळ मिळणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन लिखाणाचा सराव राहिला नाही. त्यामुळे लेखी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना जास्त वेळ देण्यात यावा, अशी मागणी युवासेनेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली होती. युवासेनेकडून करण्यात आलेल्या मागणीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी कुलकरुंसोबत बैठक घेत विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला. उदय सामंतांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये होणाऱ्या ऑफलाईन प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेसाठी वेळ वाढविण्यासंदर्भात परिपत्रक सुद्धा जारी केले आहे. दरम्यान, कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण कॉलेजमधून थेट मोबाईल आणि टॅबवर आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची हातामध्ये पेन घ्यायची सवयी तुटली होती. त्यांचा लिखाणाचा सराव सुद्धा कमी झाला होता. अशामध्ये विद्यार्थ्याना वेळेमध्ये पेपर सोडवून होईल की नाही यांचे टेन्शन आले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी