Mumbai Crime News : दसर्‍याच्या दिवशी मुंबईत घडली धक्कादायक घटना, विशीतल्या तरुणीसोबत...

Mumbai Crime News :  काल बुधवारी मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दसरा सण साजरा झाला. परंतु काल मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या कुर्ला भागात एका तरुणीचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका नाल्यात आढळला आहे. या तरुणीचा मृतदेह अर्धा सडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

women dead body found in kurla
कुर्ल्यात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या कुर्ला भागात एका तरुणीचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका नाल्यात आढळला आहे.
  • या तरुणीचा मृतदेह अर्धा सडलेल्या अवस्थेत होता.
  • पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Mumbai Crime News : मुंबई : काल बुधवारी मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दसरा सण साजरा झाला. परंतु काल मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या कुर्ला भागात एका तरुणीचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका नाल्यात आढळला आहे. या तरुणीचा मृतदेह अर्धा सडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तरुण मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. (unknown women dead body found in kurla police start investigation on murder case)

अधिक वाचा : Uddhav Thackeray: 'बाप चोरणारी अवलाद... अरे स्वत:च्या वडिलांचं तरी नाव लावायचं ना', ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर घणाघाती वार


काल सकाळी 11 च्या सुमारास चुनाभट्टी भागातील बुनतारा भवन येथील जवळच्या एका नाल्यात एका गोणीमध्ये या तरुणीचा मृतदेह तरंगत होता. स्थानिक नागरिकांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांना माहिती मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली. या गोणीमध्ये एका विशीतल्या तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीचे हात पाय बांधून तिला गोणीत भरण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.  या भागात पोलिसांना एक संशयास्पद गाडीही आढळली आहे. 

अधिक वाचा : एकनाथाला एकटा पडू देऊ नका - जयदेव ठाकरे 

प्रथमदर्शनी पाहता या मुलीचा खून करून तिचा मृतदेह फेकला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. तरुणीच्या शरीरावर कुठल्याही जखमा नाहीत, परंतु तिच्या गळ्यावर काही खुणा दिसत आहेत. याचा अर्थ तरुणीचा गळा आवळून तिचा खून करण्यात आला असावा. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर तरुणीची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांकडे असून तिच्या खुन्याचाही शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणी कुठल्या तरुणीची बेपत्ता झाल्याची तक्रार झाली आहे का याचा तपास करत आहे. तसेच ज्या भागात महिलेचा मृतदेह आढळला त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी