rain in mumbai : मुंबईकरांना जानेवारीत पावसाचं 'सरप्राइज गिफ्ट'

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 08, 2022 | 15:32 IST

unseasonal rain in western suburbs of mumbai : मुंबईकरांना जानेवारीत पावसाचं 'सरप्राइज गिफ्ट' मिळालं. दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण होतं. अखेर आज (शनिवार ८ जानेवारी २०२२) सकाळी पश्चिम उपनगरांत पावसानं हजेरी लावली. पावसामुळे मुंबईत गारवा आणखी वाढला.

unseasonal rain in western suburbs of mumbai
मुंबईकरांना जानेवारीत पावसाचं 'सरप्राइज गिफ्ट' 
थोडं पण कामाचं
  • मुंबईकरांना जानेवारीत पावसाचं 'सरप्राइज गिफ्ट'
  • पावसामुळे मुंबईत गारवा आणखी वाढला
  • अवेळी पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांच्या आजारपणात भर पडण्याची शक्यता

unseasonal rain in western suburbs of mumbai : मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉनच्या संकटामुळे मुंबईकरांना सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य समारंभ करणे जमले नाही. पण नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात निसर्गाने मुंबईकरांना चकीत केलं. मुंबईकरांना जानेवारीत पावसाचं 'सरप्राइज गिफ्ट' मिळालं. दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण होतं. अखेर आज (शनिवार ८ जानेवारी २०२२) सकाळी पश्चिम उपनगरांत पावसानं हजेरी लावली. पावसामुळे मुंबईत गारवा आणखी वाढला.

गारव्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी ही नव्या समस्येच्या आगमनाची चाहुल ठरण्याची शक्यता आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांच्या आजारपणात भर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार शुक्रवार ७ जानेवारी २०२२ पर्यंत मुंबईत ओमायक्रॉनचे ५६५ रुग्ण आढळले. तसेच मुंबईत ९१ हजार ७३१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या परिस्थितीत अवेळी पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी घरचे ताजे आणि सकस अन्न खावे. शिळे पदार्थ खाणे टाळावे. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे. पिण्यासाठी गाळून आणि उकळून घेतलेले पाणी वापरावे. स्वतःची आणि परिसराची स्वच्छता करावी. कोविड प्रोटोकॉल पाळावा आणि मास्क वापरावा. पात्र व्यक्तींनी नियमानुसार लसीकरण करुन घ्यावे. तब्येत बिघडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करुन घ्यावे. परस्पर औषधे घेणे टाळावे; असे आवाहन वैद्यकीय क्षेत्राकडून मुंबईकरांना करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी