Urmila Matondkar: आता शिवसैनिक झाली उर्मिला मातोंडकर, बांधले शिवबंधन हाती 

अभिनेत्री आणि नेता म्हणून ओळख असलेल्या उर्मिला मातोंडकरची नवी ओळख शिवसेनेची रणरागिणी अशी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

urmila matondkar joins shiv sena in presence of uddhav thackeray
आता शिवसैनिक झाली उर्मिला मातोंडकर 

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेत सामील झालेल्या उर्मिलाने काँग्रेसच्या तिकिटावर २०१९ ची लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले होते
  • काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून वेगळा मार्ग निवडला 
  • मातोश्रीवर जाऊन घेतला शिवसेनेत जाहीर प्रवेश 

मुंबई : अभिनेत्री आणि नेता म्हणून ओळख असलेल्या उर्मिला मातोंडकरची नवी ओळख शिवसेनेची रणरागिणी अशी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा हात हातात घेऊन राजकारणात प्रवेश केला. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून आपले नशीब आजमावले, पण त्या ठिकाणी अपयश आले. पण तरीही तिने लढणे सोडले नाही, आता ती लढवय्याचा पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेची रणरागिणी म्हणून दिसणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर हिने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ज्या उद्देशाने उर्मिला काँग्रेसमध्ये सामील झाली होती, ते करताना तिला अडचणी आल्या होत्या, त्यामुळे तिने काँग्रेसला हात दाखवत टाटा बायबाय केले होते. 

मातोश्री येथे झालेल्या छोट्या कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर हिच्या हातावर सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. 

शिवसेनेला भेटला फायर ब्रँड चेहरा 

आता प्रश्न हा उपस्थित होतो की उर्मिला मातोंडकर शिवसेनेत का दाखल झाली आहे.  या संदर्भात जाणकारांचे मत असे आहे की शिवसेना अशा एका चेहऱ्याला पक्षात सामील करू इच्छित आहे की ज्याचे हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. त्यामुळे हे सर्व गुण उर्मिलामध्ये असल्याने उद्धव ठाकरे यांना योग्य चेहरा मिळाला आहे. तसेच कंगना राणावत हिच्या हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी बॉलिवूडमधून एक चेहरा शिवसेनाला हवा होता. तो उर्मिलाच्या रुपाने मिळाला आहे. 

२०१९ मध्ये झाला होता पराभव 

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून रिंगणात उतरणाऱ्या उर्मिला मातोंडकरला पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी प्रचंड मतांनी तिचा पराभव केला होता. या निवडणुकीत तिच्या काश्मिरी मुसलमान पतीवरूनही तिच्यावर टीकेची झोड उठवली गेली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी