नशेसाठी कफ सिरपचा वापर; ३५ लाख रुपयांचा 'कफ सिरफ'साठा जप्त, भिवंडीत एनसीबीची मोठी कारवाई

मुंबई
भरत जाधव
Updated May 22, 2022 | 11:46 IST

भिवंडी (Bhiwandi) परिसरात मुंबई एनसीबीने (NCB) ने कफ सिरफच्या साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. एनसीबीच्या (NCB) मुंबई युनिटने भिवंडी परिसरातून नशेसाठी (intoxication) वापरल्या जाणाऱ्या कफ सिरफचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ८ हजार ६४० सिरफच्या बाटली जप्त करण्यात आल्या आहेत. कफ सिरफचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Use of cough syrup for intoxication; Cough stocks worth Rs 35 lakh confiscated
एनसीबीकडून कफ सिरफच्या ८ हजार ६४० बाटल्या जप्त   |  फोटो सौजन्य: Google Play

मुंबई: भिवंडी (Bhiwandi) परिसरात मुंबई एनसीबीने (NCB) ने कफ सिरफच्या साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. एनसीबीच्या (NCB) मुंबई युनिटने भिवंडी परिसरातून नशेसाठी (intoxication) वापरल्या जाणाऱ्या कफ सिरफचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ८ हजार ६४० सिरफच्या बाटली जप्त करण्यात आल्या आहेत. कफ सिरफचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान या प्रकरणी एनसीबीने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची पुढील चौकशी करण्यात येत आहे. मिळालेली माहिती अशी, एनसीबी (NCB) मुंबई युनिटने भिवंड परिसरातून ८६४० नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरफचासाठा जप्त केल्या आहेत. भिवंडीतील आग्रा-मुंबई महामार्गावर हा साठा एका गाडीतून येणार असल्याची माहिती एनसीबीला (NCB) मिळाली होती. त्यानुसार एका संशयित बोलेरो पिकअपची एनसीबी ( NCB) अधिकाऱ्यांनी झडती घेतली. यावेळी वाहनातील ६० बॉक्समध्ये एकूण ८६४ किलो (८६४० बाटल्या) कोडीन आधारित कफ सिरप भरलेले आढळले. या छाप्यात जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ३५ लाख रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एनसीबी (NCB) अधिकरी या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहे.

कशी पकडले ड्रग्ज?

अशा प्रकारे कफ सिरपचा वापर नशेसाठी केला जात असून आग्रा- मुंबई महामार्गावरून त्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती NCB मुंबईला त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. मुंबई NCB च्या एका पथकाने भिवंडीजवळ आग्रा-मुंबई महामार्गावर पाळत ठेवली आणि एक बोलेरो पिकअप अडवली. ही गाडी अडवल्यानंतर दोन तासांनंतर औषधं घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या गाडीला पकडण्यासाठी मुंबई NCB ने सापळा रचला. NCB पथकाने सुमारे 2 किलोमीटर पायी पाठलाग करत औषधं घेण्यासाठी आलेल्या गाडीला पकडलं.  गाडीची झडती घेतली असता वाहनातील ६० बॉक्समध्ये एकूण ८६४० किलो कोडीने आधारित कफ सिरप पद्धतशीरपणे भरलेलं आढळले.  ही औषधे मुंबई आणि ठाण्यातील विविध भागांमध्ये मादक पदार्थ म्हणून पुरवले जाणार होते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषध नशा करण्यासाठी वापरली जाणार होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी