Various courses of Maharashtra State Skill University will start from 1 November 2022 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (MSSU) आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA) या न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमांची सुरुवात मंगळवार 1 नोव्हेंबर 2022 पासून होणार आहे.
राम मंदिराचे काम कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण होणार, तारीख ठरली; वेगाने काम सुरू
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राची औपचारिक सुरुवात होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नोबेल पारितोषिक विजेते रिच रॉबर्ट्स, मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, MSSU च्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिस्टन टेक्निकल स्कुल, पहिला मजला, मेट्रो सिनेमाजवळ, मुंबई येथे होणार आहे. कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या डिजिटल फलकाचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे राज्य सरकारची कौशल्य विद्यापीठामागील भूमिका, सरकारी पाठिंबा आणि भविष्यातील योजना तसेच कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची माहिती, उद्दिष्ट, ध्येय सविस्तरपणे सांगणार आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची सुरुवात ऑगस्ट २०२२ मध्ये करण्यात आली. हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांशी संलग्न आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना १ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.