शिवसेनेत प्रवेश करणार भाजपचे हे दोन बडे नेते 

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. वसंत गिते आणि सुनील बागुल हे दोन मोठे नेते आज भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

vasant gite sunil bagul to join shivsena today leave bjp
शिवसेनेचे भाजपला दोन धक्के  

थोडं पण कामाचं

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
  • वसंत गिते आणि सुनील बागुल हे दोन मोठे नेते आज भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
  • महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई:  शिवसैनिक राजकारणात प्रवेश केलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

गिते आणि बागुल हे सध्या भाजपमध्ये विजनवासात आहेत. मागील कार्यकारिणीत दोघांकडे प्रदेश उपाध्यक्षपद होते. परंतु, नव्या कार्यकारिणीत दोघांना पदावरून हटवण्यात येऊन पक्षात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे राजकीय वजन वाढविण्यात आले. त्यामुळे ते नाराज होते. अलीकडेच गिते यांनी सर्वपक्षीय समर्थकांना 'मिसळ पार्टी' देऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हाच ते वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

गिते आणि बागुल यांनी दोनच दिवसांपूर्वी 'वर्षा' बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री त्यांनी नाशिकमध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. संजय राऊत हे आज पत्रकार परिषद घेऊन गिते आणि  बागुल यांच्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता वर्षा बंगल्यावर ठाकरे यांच्या उपस्थितीत दोघे शिवबंधन हाती बांधणार आहेत.

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यापूर्वी आज भाजपला धक्का बसला आहे. गिते आणि बागुल यांच्या पक्षांतरानंतर नाशिकमधील स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार असून भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी